ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड (page 205)

पिंपरी / चिंचवड

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारची ट्रकला मागून धडक; आयकर अधिका-याचा जागीच मृत्यू

पिंपरी: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका आयकर अधिका-याचा मृत्यू झाला तर अन्य दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) पहाटे पाचच्या सुमारास अमरजाई जवळ झाला.  अभिषेक अनिल त्यागी (वय-28 मूळ रा.मथुरा, उत्तर प्रदेश), असे मयत अधिका-याचे नाव असून ते …

Read More »

महेशदादा मंत्री होणार…कार्यकर्त्यांना मोठा विश्वास, वाढदिवसाचे निमित्त ‘मंत्रीसाहेब’ फ्लेक्स झळकले!

भोसरी : राज्य मंत्रीमंडळाचा अखेरचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर होणार असल्याचे, निश्चित झाले आहे. या विस्तारात पिंपरी-चिंचवडमधून  भोसरीचे अपक्ष आमदार महेशदादा लांडगे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा असतानाच दादांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘मंत्रीसाहेब’ अशा शुभेच्छा देणारे फलक शहरभर लावले आहेत. दादा मंत्री होणार असल्याचा मोठा आत्मविश्वास त्यांच्या …

Read More »

बँकांचे कामकाज मराठीत करा, अन्यथा मनसेचे खळ्खट्याक ! पंधरा दिवसांची दिली मुदत

पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज येत्या १५ दिवसात मराठीत करावे अन्यथा मनसे स्टाईलने खळ्खट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. बँकांच्या अनेक ग्राहकांना इंग्रजी भाषेची अडचण जाणवत असल्यामुळे शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपले सर्व …

Read More »

काळेवाडी, रहाटणीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

पिंपरी : पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने काळेवाडी आणि रहाटणी परिसरात नव्याने सुरु असलेल्या 12 अनधिकृत बांधकामावर बुधवारी (दि. 22) कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाच हजार 300 चौरस फूट इतके क्षेत्रफळ मोकळे केले. ‘ब’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने काळेवाडीतील विजयनगर येथील महाराष्ट्र कॉलनी, इंडियन कॉलनी आणि स्वप्ननगरी कॉलनीतील पूररेषेतील तळजमल्यावरील तीन बांधकामे …

Read More »

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खिंवसरा शाळेने मिळविले यश – लक्ष्मण जगताप

पिंपरी: खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील ‘ प्राथमिक विद्यामंदिर’  या शाळेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा  मिळवलेला ” आदर्श शाळा पुरस्कार”  हा अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मिळवलेला पुरस्कार आहे. शाळेच्या भौतिक कमतरतेवर मात करत शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी मेहनतीने मिळवलेला हा पुरस्कार आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती …

Read More »

रस्त्याच्या कामासाठी सल्लागारांची नियुक्ती; स्थायीची आयत्यावेळी मान्यता

पिंपरी: पिंपळे सौदागर येथील झरवरी रस्ता, स्मशानभूमी ते सर्व्हे क्रमांक 23 पर्यंतचा रस्ता, रहाटणी महापालिका शाळा ते पिंपळे सौदागार स्मशानभूमी रस्ता, प्रभाग 26 मधील ताब्यात आलेले डीपी रस्ते आणि पिंपळे निलखमधील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणातील रस्त्यांचे विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी इन्फिनिटी कन्स्लटिंग इंजिनिअर्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती …

Read More »

पिंपरी पालिका स्थायीची 122 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 121 कोटी 49 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली. तसेच महापालिकेच्या वतीने तसेच इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन यांच्या मान्यतेने सांगवी येथे महापौर चषक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 2017  आयोजित करण्यास व त्यासाठी येणा- या प्रत्यक्ष …

Read More »

पालिकेच्या कामकाजात ‘डिजिटलायजेशन’वर भर देणार – महापौर काळजे

पिंपरी: स्पेनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सर्व कामकाज होते. केंद्र, राज्य सरकार आणि पालिका पुरवित असलेल्या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजात देखील त्याच धर्तीवर ‘डिजिटलायजेशन’वर  भर देण्यात येणार असल्याचे, महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. स्पेन देशातील बार्सिलोना शहरात झालेल्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस 2017’  या परिषदेमध्ये …

Read More »

‘स्मार्ट सिटी अभियानासाठी स्वतंत्र सेलची स्थापना

पिंपरी: स्मार्ट सिटी अभियानांतर्गतचे कामकाज विहित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ सेलची स्थापना करण्यात आली आहे. सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर हे तर सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण कामकाज पाहणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अख्यत्यारित …

Read More »

आता गुगल मॅपवर दिसणार शहरातील सार्वजनिक शौचालये

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने आणखी एक हायटेक पाऊल उचलले असून महापालिकेने शहरातील 535 स्वच्छता गृहांचे गुगल मॅपिंग केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता एका क्लिकवर शहरातील त्यांच्या परिसरातील स्वच्छता गृह दिसणार आहे. केंद्र शासनाचे शहरी विकास मंत्रालयाने देशातील निवडक शहरामध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये यामध्ये पेट्रोलपंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बस स्टँड याचे …

Read More »