ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारची ट्रकला मागून धडक; आयकर अधिका-याचा जागीच मृत्यू

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारची ट्रकला मागून धडक; आयकर अधिका-याचा जागीच मृत्यू

पिंपरी: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका आयकर अधिका-याचा मृत्यू झाला तर अन्य दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) पहाटे पाचच्या सुमारास अमरजाई जवळ झाला.
 अभिषेक अनिल त्यागी (वय-28 मूळ रा.मथुरा, उत्तर प्रदेश), असे मयत अधिका-याचे नाव असून ते आयकर खात्यात नव्यानेच रुजू झाले होते. तर के के मिश्रा आणि आनंद उपाध्याय हे अधिकारी जखमी झाले आहेत.
 महामार्गावर चाक जॅम झाल्याने अचानक ट्रक बंद अवस्थेत थांबला होता तर खासगी तवेरा (एमएच 12 एफसी 2615) गाडीतून आयकर विभागाचे तीन अधिकारी व गाडीचा चालक हे पुण्याच्या दिशेने जात असताना गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट समोर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये समोरच्या सीटवर चालकाच्या बाजूला बसलेल्या त्यागी यांचा जागीच मृत्यू झाला तर मिश्रा व उपाध्याय हे गंभीर जखमी झाले. चालकाला मात्र कोणतीही हानी झालेली नाही. हे अधिकारी तळेगाव येथून पुण्याला जात होते. ते तळेगावमध्ये छापा टाकण्यासाठी आले असल्याचे समजते. घटनास्थळी जाऊन देहुरोड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला तर जखमींना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
मयत अभिषेक त्यागी हे केमिकल इंजिनिअर होते. त्यांनी त्यांचे शिक्षण थापर विद्यापीठ पटियाला येथून पूर्ण केले होते.ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांची भारतीय आयकर खात्यात मुंबई येथे नियुक्ती झाली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांची पुण्यात बदली झाली होती. 

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *