ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पालिकेच्या कामकाजात ‘डिजिटलायजेशन’वर भर देणार – महापौर काळजे

पालिकेच्या कामकाजात ‘डिजिटलायजेशन’वर भर देणार – महापौर काळजे

पिंपरी: स्पेनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सर्व कामकाज होते. केंद्र, राज्य सरकार आणि पालिका पुरवित असलेल्या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजात देखील त्याच धर्तीवर ‘डिजिटलायजेशन’वर  भर देण्यात येणार असल्याचे, महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.
स्पेन देशातील बार्सिलोना शहरात झालेल्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस 2017’  या परिषदेमध्ये महापौर नितीन काळजे सहभागी झाले होते. याबाबत माहिती देताना महापौर काळजे म्हणाले, “शहरातील महापालिकेचे निरनिराळे विभाग पुरवित असलेल्या विविध सेवा व सुविधांचे तसेच राज्यशासन व केंद्रशासन यांच्यामार्फत नियोजित वेगवेगळया प्रकल्पांचे ऑनलाईन पध्दतीने एकत्रितपणे सर्व प्रकारच्या कामकाजाचे नियोजन हे एकाच संकेतस्थळावरील डॅशबोर्डव्दारे अत्यंत सुव्यवस्थित व बिनचूकपणे करता येते. त्याठिकाणी नागरिकांना वेगवेगळया सेवा सुविधा हया खालीलप्रमाणे देण्यात येत असल्याचे दिसून आले. महापालिका हद्दीतील सर्व मिळकतींचा मिळकत भरणा हा ऑनलाईन अद्ययावत संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात येतो.
महापालिका क्षेत्रातील बांधकामविषयक सर्व परवानग्या, विविध प्रकारची कामे देखील संगणकीय माध्यमातून पार पाडण्यात येतात. महापालिकेची सर्व रुग्णालये ही रुग्णांना संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सेवा देतात. महापालिकेच्या सर्व विभागाच्या विकासकामासंदर्भातील निविदाविषयक कामकाजासंबंधीची अद्यावत सद्यस्थिती संबंधीची माहिती संगणकाच्या माध्यमातून दिली जाते.
महापालिकेल्या पाणीपुरवठा योजना तसेच दैनंदिन पाणीपुरवठयाविषयीचे नियंत्रण, देखभाल दुरुस्ती ही संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात येते. महापालिकेल्या विद्युतविषयक सर्व कामासंबंधीची माहिती ही देखील संगणकाच्या माध्यमातून अद्ययावत करण्यासोबतच वीज चालू अथवा बंद करण्याचे नियोजन देखील पार पाडण्यात येते. महापालिकेच्या कचरा संकलन आणि कचरा वाहतूक तसेच कच-याची विल्हेवाट लावण्यासंबंधीची अद्यावत यंत्रणा उपलब्ध असून त्याव्दारे कचरा विल्हेवाटीचे कार्य पार पाडण्यात येते. महापालिकेच्या वेगवेगळया जल:निस्सारण केंद्राचे कामकाज हे संगणकाच्या माध्यमातून नियंत्रित करण्याबरोबरच त्याप्रमाणे देखभाल दुरुस्तीचे काम पार पाडले जाते.
महापालिका कार्यक्षेत्रातल्या मोक्याच्या ठिकाणी पार्किंगच्या अद्ययावत सद्यस्थितीसंबंधीची माहिती देखील ऑनलाईन तसेच मोबाईल ऍपच्या माध्यमातून देण्यात येते. त्यामुळे नागरिकांना पार्किंगविषयीची उपलब्धता लक्षात येते. महापालिकेच्या रस्त्यांवरील गर्दीविषयी तसेच वाहतूक कोंडीविषयीचे नियंत्रण अथवा नियोजन देखील शिस्तबध्द पध्दतीने संगणकीय प्रणालीच्या व्दारे करण्यात येते. व डॅशबोर्डव्दारे त्याची सद्यस्थिती ही प्रशासनास कळते. ज्यामुळे प्रशासनास पुढील कार्यवाही करणे सोपे जाते. त्यामध्ये शहराच्या मुख्य चौकातील वाहतूक गर्दीबाबतची अद्ययावत माहिती, सद्यस्थिती देखील नागरिकांना वेळोवेळी प्रवास करत असताना देखील समजते.
पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकरिता तसेच सर्व सेवा सुविधांचे अद्ययावतीकरण करुन संगणकाच्या डॅशबोर्डवर एकत्र ठेवून त्याचे नियंत्रण व पाहणी करुन त्या अनुषंगाने कृती करण्यासंबंधीची उपाय योजना आपल्या शहरात देखील राबविण्याचे नियोजन व कृती करुन प्रशासन अधिकाधिक वेगवान व लोकाभिमुख करणे संगणकीय प्रणालीव्दारे शक्य होईल, असेही महापौर काळजे यांनी सांगितले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *