ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / काळेवाडी, रहाटणीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

काळेवाडी, रहाटणीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

पिंपरी : पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने काळेवाडी आणि रहाटणी परिसरात नव्याने सुरु असलेल्या 12 अनधिकृत बांधकामावर बुधवारी (दि. 22) कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाच हजार 300 चौरस फूट इतके क्षेत्रफळ मोकळे केले. ‘ब’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने काळेवाडीतील विजयनगर येथील महाराष्ट्र कॉलनी, इंडियन कॉलनी आणि स्वप्ननगरी कॉलनीतील पूररेषेतील तळजमल्यावरील तीन बांधकामे पाडली. रहाटणीतील बळीराज कॉलनी परिसरातील दोन हजार 500 चौरस फुटांची तीन वाढीव बांधकामे पाडण्यात आली. साईज्योत कॉलनी येथील दोन पक्की बांधकामे, एक पत्राशेड तसेच तीन वाढीव बांधकामे पाडण्यात आली. कार्यकारी अभियंता मकरंद निकम, मनोज सेठिया यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *