ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘स्मार्ट सिटी अभियानासाठी स्वतंत्र सेलची स्थापना

‘स्मार्ट सिटी अभियानासाठी स्वतंत्र सेलची स्थापना

पिंपरी: स्मार्ट सिटी अभियानांतर्गतचे कामकाज विहित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ सेलची स्थापना करण्यात आली आहे. सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर हे तर सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण कामकाज पाहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अख्यत्यारित जेएनएनयुआरएम, पंतप्रधान आवास योजना, अमृत अभियानाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही कामे वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने या कामकाजासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर असणार आहेत. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण सह मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयाचे उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. राजीव घुले यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार, आबासाहेब चौधरी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. लिपिक प्रांजल इंगळे, प्रशांत यादव आणि शिपाई एकनाथ येंचवाड यांची स्मार्ट सिटी कक्षाच्या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

या अधिकारी, कर्मचा-यांच्या कामकाजाचे नियोजन व वाटप मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी करायचे आहे. तसेच कक्षाच्या दैनंदिन कामकाजाबाबतचा अहवाल प्रत्येक आठवड्यास आयुक्तांना देणे बंधनकारक आहे, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *