ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / बँकांचे कामकाज मराठीत करा, अन्यथा मनसेचे खळ्खट्याक ! पंधरा दिवसांची दिली मुदत

बँकांचे कामकाज मराठीत करा, अन्यथा मनसेचे खळ्खट्याक ! पंधरा दिवसांची दिली मुदत

पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज येत्या १५ दिवसात मराठीत करावे अन्यथा मनसे स्टाईलने खळ्खट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
बँकांच्या अनेक ग्राहकांना इंग्रजी भाषेची अडचण जाणवत असल्यामुळे शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपले सर्व कामकाज मराठीत करावे, बँकांचे विविध प्रकारचे फॉर्म, माहितीपत्रके, सूचना फलक, बँकेच्या नावाचा फलक हा मराठी भाषेत असावा, बँकांच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी मराठीतून संवाद साधावा अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व बँकांमधून सी सी टीवी बसवावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक राज्याच्या त्या-त्या भाषेमध्ये बँकांचे कामकाज चालले पाहिजे अशा आशयाचे बँकांचे आदेश असल्याचे चिखले यांनी नमूद केले. त्यामुळे महाराष्ट्रात बँकांचे सर्व कामकाज मराठीतूनच केले पाहिजे अशी आग्रही मागणी चिखले यांनी केली.
येत्या पंधरा दिवसात अशा प्रकारचा बदल न केल्यास मनसेतर्फे खळ्खट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला अंकुश तापकीर, राजू सावळे, हेमंत डांगे, राजेश अवसरे, रुपेश पाटेकर, संजय यादव आदी उपस्थित होते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *