ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / महेशदादा मंत्री होणार…कार्यकर्त्यांना मोठा विश्वास, वाढदिवसाचे निमित्त ‘मंत्रीसाहेब’ फ्लेक्स झळकले!

महेशदादा मंत्री होणार…कार्यकर्त्यांना मोठा विश्वास, वाढदिवसाचे निमित्त ‘मंत्रीसाहेब’ फ्लेक्स झळकले!

भोसरी : राज्य मंत्रीमंडळाचा अखेरचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर होणार असल्याचे, निश्चित झाले आहे. या विस्तारात पिंपरी-चिंचवडमधून  भोसरीचे अपक्ष आमदार महेशदादा लांडगे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा असतानाच दादांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘मंत्रीसाहेब’ अशा शुभेच्छा देणारे फलक शहरभर लावले आहेत. दादा मंत्री होणार असल्याचा मोठा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
भाजप-शिवसेना सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकारचा अखेरचा मंत्रीमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. नागपूर येथे 11 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनला सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या मंत्रिमंडळात पिंपरी-चिंचवडमधून आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे की मावळचे आमदार बाळा भेगडे यांची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
मोदी लाटेत देखील महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येण्याची किमया केली. महापालिका निवडणुकीवेळी आमदार महेशदादांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचा देखील भाजपध्ये प्रवेश घडवून आणला. महापालिकेतील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता उलथवून लावली. प्रथमच भाजपचे एकहाती सत्ता आली. पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता येण्यामध्ये महेशदादांचा मोठा वाटा आहे.
पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहराला ‘लाल’ दिवा दिला जाईल, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मंत्रीमंडळ विस्ताराचे वारे जोरदार वाहू लागले आहे. भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचा येत्या सोमवारी (दि.27) वाढदिवस आहे. याचे निमित्त साधून कार्यकर्त्यांनी ‘मंत्रीसाहेब’ असा मजकूर लिहिलेले फलक शहरभर लावून महेशदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ‘मंत्री’ या शब्दाच्या वर ‘लाल’ दिवा देखील लावला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळ विस्तारात आमदार महेशदादा मंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *