ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / आता गुगल मॅपवर दिसणार शहरातील सार्वजनिक शौचालये

आता गुगल मॅपवर दिसणार शहरातील सार्वजनिक शौचालये

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने आणखी एक हायटेक पाऊल उचलले असून महापालिकेने शहरातील 535 स्वच्छता गृहांचे गुगल मॅपिंग केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता एका क्लिकवर शहरातील त्यांच्या परिसरातील स्वच्छता गृह दिसणार आहे.

केंद्र शासनाचे शहरी विकास मंत्रालयाने देशातील निवडक शहरामध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये यामध्ये पेट्रोलपंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बस स्टँड याचे ठिकाणी हा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानुसार गुगल मॅप वर जाऊन तुम्ही स्वच्छ पब्लीक टॉयलेट असे टाईप केल्यानंतर तुमच्या जवळील सर्व सार्वजनिक शैचालये तुम्हाला दिसणार आहेत.

या सुविधेमुळे बाहेरुन शहरात येणा-या नागरिकांना जवळची शौचालये शोधण्यास मदत होणार आहे. शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालय असलेला वॉर्ड क्रमांक, शौचालयाचा प्रकार, शौचालयाची मालकी, शौचालयाचा पत्ता, शौचालयाची वेळ, शौचालय वापर मोफत आहे किंवा त्याचे शुल्क आकारले जाणार आहे, शौचालय महिला/पुरुष अथवा दोन्ही वापरु शकतात, शौचालयाचा बाहेरील व आतिल फोटो इ. माहिती यामध्ये संकलीत केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये शहरामधील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे माहिती गोळा करुन गुगल मॅपिंगला गुणांक देण्यात येणार आहे. महापालिकेच्या या सुविधेचा नागरिकांनीही लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *