ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / रस्त्याच्या कामासाठी सल्लागारांची नियुक्ती; स्थायीची आयत्यावेळी मान्यता

रस्त्याच्या कामासाठी सल्लागारांची नियुक्ती; स्थायीची आयत्यावेळी मान्यता

पिंपरी: पिंपळे सौदागर येथील झरवरी रस्ता, स्मशानभूमी ते सर्व्हे क्रमांक 23 पर्यंतचा रस्ता, रहाटणी महापालिका शाळा ते पिंपळे सौदागार स्मशानभूमी रस्ता, प्रभाग 26 मधील ताब्यात आलेले डीपी रस्ते आणि पिंपळे निलखमधील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणातील रस्त्यांचे विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी इन्फिनिटी कन्स्लटिंग इंजिनिअर्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.  नाशिक फाटा चौक ते हिंजवडीपर्यंत बीआरटी कॉरीडॉर क्रमांक तीनवर विविध स्थापत्य कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून इन्फ्रा किंग कन्स्लटिंग इंजिनियर्सची नेमणूक करण्यात आली. तसेच दुर्गादेवी उद्यानासह ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील संत ज्ञानेश्‍वर, सावरकर, संत तुकाराम, माऊली व गजानन महाराज या आणि इतर उद्यानांतील झाडांना नावफलक लावण्यास आयत्यावेळी उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली. डुकरे पकडण्यासाठी जी. बी. एंटरप्रायजेसला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *