ताज़ा खबरे
Home / महाराष्ट्र (page 152)

महाराष्ट्र

अमिताभ बच्चन अपघातातून थोडक्यात बचावले

कोलकाता । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कोलकातामधील एका कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. कारमधून ते विमानतळाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी कारच्या मागचे चाक निखळले आणि अपघात झाला. अमिताभ गेल्या आठवड्यात २३ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेले होते. तेथून शनिवारी सकाळी ते मुंबईला परतणार होते. एका कारमधून ते विमानतळाकडे जात …

Read More »

ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा

अहमदनगर। शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. शेवगाव तालुक्यातल्या कारखान्याच्या व्हाईस चेअरमननी 2525 रुपयांचा दर जाहीर केला. हा दर …

Read More »

करी रोड स्टेशन पुलावरही चेंगराचेंगरीचा धोका

मुंबई। एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप प्रवाशांचा बळी गेल्यानंतरही रेल्वे स्थानकांच्या पादचारी पुलांवर ऐन गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची घुसमट थांबलेली नाही. एल्फिन्स्टन सारखीच अवस्था मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर आहे. एल्फिन्स्टन आणि परळ स्टेशनवरील प्रवाशांची बरीचशी गर्दी करी रोड स्थानकाकडे वळली असून त्या स्थानकांवरही एल्फिन्स्टनची …

Read More »

… तर या सरकारला खाली खेचणार: उद्धव ठाकरेंचा इशारा

रत्नागिरी। ‘रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला शंभर टक्के यश मिळाले आणि तुम्हाला भोपळा दिला. यामुळे तुम्ही जिल्हा परिषदेला निधी देत नाही काय?, असा सवाल करत, ‘जर आमच्या मुळावर येणार असाल आणि स्वतःचेच चेहरे छापणार असाल तर हे सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य …

Read More »

नगर, औरंगाबादेत शेतकऱ्यांचे ऊस आंदोलन पेटले!

अहमदनगर/पैठण। ऊस उत्पादक शेतकरी कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबरपासून सुरु केलेल्या ऊसदर आंदोलनाला आज शेवगाव आणि पैठणमध्ये हिंसक वळण लागले. नगरमधील शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी रस्त्यावरील वाहतूक रोखण्यासाठी जाळपोळ केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात दोन शेतकरी जखमी झाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना …

Read More »

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवू; दाऊद भडकला

मुंबई। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांचा लिलाव करण्यात आल्याने दाऊद भडकला आहे. ही मालमत्ता कोणीही ताब्यात घेऊ नये म्हणून त्याच्या साथीदाराकडून धमक्या येऊ लागल्या आहेत. ‘दाऊदची मालमत्ता कोणी ताब्यात घेतली तर मुंबईत १९९३ च्या बॉम्बस्फोटाची पुनरावृत्ती घडवून आणू. मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट करू,’ असा इशाराच त्याच्या साथीदाराने दिला आहे. मंगळवारी …

Read More »

अपघातग्रस्तांच्या मदतीला शरद पवार गेले धावून; संवेदनशीलतेचा परिचय

गडचिरोली। एरवी राजकीय डाव-प्रतिडाव, गाठीभेटी आणि वक्तव्यांमुळं चर्चेत राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आले. पवार यांच्यातील संवेदनशीलतेचा परिचय आज पुन्हा एकदा सर्वांना आला. नागपूर-गडचिरोली रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी ते स्वत: धावून गेले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची तजवीज करूनच ते पुढं मार्गस्थ झाले. नागपूर …

Read More »

घरगुती गॅस सिलिंडरचे दर 94 रुपयांनी वाढले; व्यावसायिक सिलिंडरमध्ये 220 रुपयांची वाढ

मुंबई: केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना 739  रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये तब्बल 220  रुपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे. …

Read More »

नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटली!

नवी मुंबई: नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिल्मी स्टाइलने बँकेवर टाकण्यात आलेल्या या दरोड्यामुळे नवी मुंबई पोलीसही चक्रावून गेले आहेत. जुई नगर सेक्टर-११ मध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडा पडल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. …

Read More »

लोकक्षोभापुढं सरकार झुकले; सेनेचा हल्लाबोल!

मुंबई : जीएसटीने गरीब जनता व लहान, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आणि हे बरोबर नाही. गुजरातेत लहान व्यापारी रस्त्यांवर उतरला. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल. पैशांचा पाऊस पाडूनही मतांची रोपटी उगवणार नाहीत या भयानेच जीएसटीप्रकरणी सरकार झुकले आहे. आम्ही त्या झुकण्याचे व गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करीत आहोत, पण कालपर्यंत जे देशाचे …

Read More »