ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / नगर, औरंगाबादेत शेतकऱ्यांचे ऊस आंदोलन पेटले!

नगर, औरंगाबादेत शेतकऱ्यांचे ऊस आंदोलन पेटले!

अहमदनगर/पैठण। ऊस उत्पादक शेतकरी कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबरपासून सुरु केलेल्या ऊसदर आंदोलनाला आज शेवगाव आणि पैठणमध्ये हिंसक वळण लागले. नगरमधील शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी रस्त्यावरील वाहतूक रोखण्यासाठी जाळपोळ केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात दोन शेतकरी जखमी झाले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार १०० रुपये एकरकमी भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेवगावमधील शेतकरी सोमवारपासून रस्त्यावर उतरले आहेत. घोटण येथे ऊस वाहतूक करणारी वाहने अडवली जात आहेत. मंगळवारीही आंदोलन सुरुच होते. हे आंदोलन आज चिघळले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर जाळपोळ केली. तसेच गाड्या अडवल्या. आंदोलनकर्ते शेतकरी आणि संघटनांच्या नेत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यात दोन शेतकरी जखमी झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी राखीव दलाला पाचारण केले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *