ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा

ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा

अहमदनगर। शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. शेवगाव तालुक्यातल्या कारखान्याच्या व्हाईस चेअरमननी 2525 रुपयांचा दर जाहीर केला. हा दर आंदोलक आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मान्य केला. त्यामुळं तातडीनं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.
दरम्यान, हे आंदोलन शमविण्यासाठी आणि ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी साखर आयुक्तांसोबत बैठक सुरू होती. दुपारी चार वाजलेपासून सुरू झालेल्या या बैठकीत अखेर तोडगा निघाला. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक पार पडली. उसाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. हे आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी वेळीच पावले टाकण्यात आली. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं.
शेतकऱ्यांसोबत पार पडलेल्या या बैठकीला आयुक्तांसह पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकरीही उपस्थित होते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *