ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / अपघातग्रस्तांच्या मदतीला शरद पवार गेले धावून; संवेदनशीलतेचा परिचय

अपघातग्रस्तांच्या मदतीला शरद पवार गेले धावून; संवेदनशीलतेचा परिचय

गडचिरोली। एरवी राजकीय डाव-प्रतिडाव, गाठीभेटी आणि वक्तव्यांमुळं चर्चेत राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आले. पवार यांच्यातील संवेदनशीलतेचा परिचय आज पुन्हा एकदा सर्वांना आला. नागपूर-गडचिरोली रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी ते स्वत: धावून गेले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची तजवीज करूनच ते पुढं मार्गस्थ झाले.
नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर शरद पवार रस्ते मार्गाने गडचिरोलीला जात होते. त्याचवेळी भिवापूर तालुक्याजवळ एका टिपर आणि कारची धडक झाली. अपघातग्रस्त कारमध्ये ५ वर्षांच्या मुलासह चार जण अडकले होते. हे दृश्य पाहताच पवार गाडीतून उतरले. त्यांच्यामागोमाग कार्यकर्तेही कारमधून उतरले. सर्वांनी अपघातस्थळी धाव घेतली. पवारांच्या सूचनेनुसार अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतरच पवार गडचिरोलीकडे रवाना झाले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *