ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटली!

नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटली!

नवी मुंबई: नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिल्मी स्टाइलने बँकेवर टाकण्यात आलेल्या या दरोड्यामुळे नवी मुंबई पोलीसही चक्रावून गेले आहेत.

जुई नगर सेक्टर-११ मध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडा पडल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी बँक उघडण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या बाजूला असलेलेल्या दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी या बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याची माहिती मिळू शकली नाही. बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानात या भुयाराचे उगमस्थान आढळून आलंय. त्यामुळे या दुकानाचा मालक आणि दुकानातील नोकरांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. हे भुयार एका रात्रीत खोदलं गेलं नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. पूर्ण प्लॅनिंग करूनच एखाद्या टोळीने हे भुयार खोदलं असावं, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. एवढं मोठं भुयार खोदलं जात असताना आसपासच्या परिसरातील लोकांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? यावर पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *