ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / अमिताभ बच्चन अपघातातून थोडक्यात बचावले

अमिताभ बच्चन अपघातातून थोडक्यात बचावले

कोलकाता । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कोलकातामधील एका कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. कारमधून ते विमानतळाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी कारच्या मागचे चाक निखळले आणि अपघात झाला.
अमिताभ गेल्या आठवड्यात २३ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेले होते. तेथून शनिवारी सकाळी ते मुंबईला परतणार होते. एका कारमधून ते विमानतळाकडे जात होते. त्याचवेळी कारचे मागील चाक निखळले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाला. या अपघातातून ते बचावले आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयातील अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. अमिताभ यांच्यासाठी कार उपलब्ध करून देणाऱ्या ट्रव्हल एजन्सीला राज्य सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Check Also

विसर्जन के दौरान पानी टंकी में डूबने से 5 वर्षीय बालक की मौत

पिंपरी- एक तरफ,जब विसर्जन जुलूस मोशी परिसर में चल रहा था, तब एक पांच वर्षीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *