ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / घरगुती गॅस सिलिंडरचे दर 94 रुपयांनी वाढले; व्यावसायिक सिलिंडरमध्ये 220 रुपयांची वाढ

घरगुती गॅस सिलिंडरचे दर 94 रुपयांनी वाढले; व्यावसायिक सिलिंडरमध्ये 220 रुपयांची वाढ

मुंबई: केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना 739  रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये तब्बल 220  रुपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे.

तेल कंपन्यांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारची पावले गॅसच्या बाबतीतही त्याच मार्गाने पडू लागली आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर सरकार ग्राहकांना अनुदान देते. मात्र, वर्षाकाठी अनुदानित सिलिंडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेवण्यात आली आहे. महिन्याकाठी दोन सिलिंडर वापरणारीही कुटुंबे असल्याने त्यांना आता वाढीव दराने म्हणजेच खुल्या बाजारातील दराने सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. गेल्या तीन महिन्यांत सातत्याने ही वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या 14 किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत सप्टेंबरमध्ये 596 रुपये होती. ऑक्टोबरमध्ये त्यात वाढ होऊन 645 रुपये इतकी झाली. नोव्हेंबर महिन्यात हेच दर आता 738  रुपये इतके झाले आहेत.

घरपोच गॅस सिलिंडर देणा-या कर्मचा-याला आता 750 रुपये देण्यावाचून ग्राहकांना पर्यायच राहिलेला नाही. अशाच प्रकारे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरातही दर महिन्याला वाढ होत आहे. 19 किलो वजनाच्या या गॅस सिलिंडरसाठी सप्टेंबरमध्ये 1081 रुपये, ऑक्टोबरमध्ये 1158 रुपये व नोव्हेंबर महिन्यात 1304 रुपये इतके झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, चहा टपरी, खानावळ चालकांकडूनच केला जातो. आता थेट एका सिलिंडरमागे 220  रुपयांची वाढ झाल्यामुळे साहजिकच खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ करण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *