ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / करी रोड स्टेशन पुलावरही चेंगराचेंगरीचा धोका

करी रोड स्टेशन पुलावरही चेंगराचेंगरीचा धोका

मुंबई। एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप प्रवाशांचा बळी गेल्यानंतरही रेल्वे स्थानकांच्या पादचारी पुलांवर ऐन गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची घुसमट थांबलेली नाही. एल्फिन्स्टन सारखीच अवस्था मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर आहे. एल्फिन्स्टन आणि परळ स्टेशनवरील प्रवाशांची बरीचशी गर्दी करी रोड स्थानकाकडे वळली असून त्या स्थानकांवरही एल्फिन्स्टनची पुनरावृत्ती होईल, अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
करी रोड स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य रस्त्याला जोडून एकच पूल आहे. या पुलावरून जो पादचारी पूल स्टेशनवर उतरतो तो अत्यंत चिंचोळा आहे. ऐन गर्दीच्यावेळी या पुलावरून उतरून स्टेशन गाठताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक प्रवासी पुलाच्या कठड्यावर चढण्याचाही धोका पत्करताना दिसत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरही प्रवाशांना थांबून राहावे लागत आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *