ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / लोकक्षोभापुढं सरकार झुकले; सेनेचा हल्लाबोल!

लोकक्षोभापुढं सरकार झुकले; सेनेचा हल्लाबोल!

मुंबई : जीएसटीने गरीब जनता व लहान, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आणि हे बरोबर नाही. गुजरातेत लहान व्यापारी रस्त्यांवर उतरला. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल. पैशांचा पाऊस पाडूनही मतांची रोपटी उगवणार नाहीत या भयानेच जीएसटीप्रकरणी सरकार झुकले आहे. आम्ही त्या झुकण्याचे व गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करीत आहोत, पण कालपर्यंत जे देशाचे दुश्मन व अर्थव्यवस्थेचे मारेकरी होते त्यांच्या पुढे का झुकलात, ते सांगा, असा सवाल करतानाच लहान व्यापाऱ्यांच्या मिशीला करसवलतीचे तूप का लावलेत या प्रश्नाचे उत्तर मिळेल काय? ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ हेच या प्रश्नाचे उत्तर आहे!, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. जीएसटीतील काही सैतानी तरतुदींना विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना देशाचे शत्रू वगैरे ठरविण्यापर्यंत सत्ताधारी पक्षाची व त्यांच्या मंत्र्यांची मजल गेली होती. आपणच कौटिल्याचे बाप असून देशाचे व गरीबांचे अर्थशास्त्र फक्त आम्हालाच समजते अशा तोऱ्यात वावरणाऱ्यांचे गर्वहरण शेवटी जनतेनेच केले. लोकक्षोभापुढे सरकार झुकले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *