ताज़ा खबरे
Home / Raftar News (page 299)

Raftar News

गंगास्नानावेळी झाली चेंगराचेंगरी; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री नितीशकुमार?

बिहार। (PNE)- कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय येथील सिमरिया घाटावर आज सकाळी गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गंगा नदीच्या घाटावर आज पूजेसाठी आणि स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला. त्यानंतर चेंगराचेंगरी …

Read More »

भाजपकडे माझी बनावट सेक्स सीडी; हार्दिक पटेलचा घणाघाती आरोप

अहमदाबाद। (PNE)- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. माझी बदनामी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी माझी बनावट सेक्स सीडी तयार केली आहे, असा दावा त्याने केला आहे. राज्यात निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी …

Read More »

इत्तफाकः ‘योगायोगा’चा जमलेला थरार सिनेरिव्ह्यू

सस्पेन्स थ्रिलर दोन प्रकारचे असतात. एखाद्या रहस्याची उकल करण्यासाठी ढीगभर पात्रं समोर असतात, संशयाची सुई सतत एकाकडून दुसऱ्याकडे फिरत असते आणि सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली व्यक्तीच गुन्हेगार म्हणून पुढे येते. तर, दुसऱ्या प्रकारच्या ‘सस्पेन्स थ्रिलर’मध्ये मोजक्याच व्यक्तिरेखा असतात. घडलेल्या घटनेची प्रत्येकाची आपापली ‘व्हर्जन’ असतात. मात्र, सत्य एकच असते. रहस्य उलगडण्याच्या …

Read More »

शेतकरी आत्महत्याचे विदारक दृष्य कलाकार साकारायला गेला अन्‌…

शेतकरी आत्महत्येचा सीन करताना फास लागला! नागपूर। (PNE)- निसर्ग आणि व्यवस्थेच्या जाळ्यात अडकलेला शेतकरी गळफास घेऊन आपले जीवन संपवीत आहे. याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची धग मांडण्यासाठी रामटेकच्या वैकुंठ चतुर्दशीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शेतकरी आत्महत्येचा देखावा साकारण्यात आला. गळ्यात फास लावून कलाकार ट्रॅक्टरमध्ये बसला. गांधी चौकातून यात्रा जात असतानाच अचानक धक्का बसला आणि …

Read More »

सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला;

बेळगाव। (PNE)- ‘जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारताचाच भाग राहणार आहे. सोशल मीडियामुळे दहशतवादाचे प्रकार वाढले आहेत,’ असे मत लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे झालेल्या शानदार समारंभात लष्कर प्रमुख …

Read More »

संविधान जागर सभा; नाशिकमध्ये कन्हैयाच्या सभेत पाण्याच्या बाटल्यांना बंदी

नाशिक। (PNE)-शहरात रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान जागर सभेत पाणी बॉटल्ससह कुठलेही साहित्य नेण्यास बंदी करण्यात आली आहे. सभेत जेएनयू विद्यार्थी संघाचा कन्हैया कुमार भारतीय विद्यार्थी आणि युवकांपुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई नाका येथील तूपसाखरे लॉन्समध्ये दुपारी चार वाजता ही सभा होणार असून, तयारी अंतिम टप्प्यात …

Read More »

हाय व्हॉट्स अप!! ठप्प झालेलं व्हॉट्सअॅप तासाभरानंतर सुरू

नवी दिल्ली ।(PNE)- भारतासह जगभरात तब्बल तासभर ‘डाऊन’ होऊन असंख्य युजर्सचा ‘बीपी अप’ करणारं व्हॉट्सअॅप अखेर सुरू झालं आहे. तासाभरानंतर व्हॉट्सअॅपवरून पुन्हा एकदा संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली असून त्यामुळं युजर्सच्या जीवात जीव आला आहे. व्हॉट्सअॅप अचानक ठप्प होण्याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी दोन वाजल्यापासून व्हॉट्सअॅपवरील …

Read More »

बुलडाणा: देवदर्शनाहून परतताना अपघात, ३ ठार

बुलडाणा। (PNE)- बुलडाण्यातील जाईचा देव येथून देवदर्शनाहून परतताना चिखली-मेहेकर मार्गावर भाविकांचे वाहन उलटले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर इतर ५ भाविक जखमी झाले आहेत. या अपघातातून चार महिन्यांचे बाळ बचावले आहे. नांदेड जिव्ह्यातील उमरी येथील भाविक जाईचा देव येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर ते चारचाकी वाहनाने …

Read More »

पोलिसाच्या मुलीवर ३ तास सामूहिक बलात्कार

भोपाळ। (PNE)- महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजले जाणारे मध्य प्रदेशातील भोपाळ शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या १९ वर्षांच्या मुलीवर चौघांनी तीन तास बलात्कार केला. पोलीस ठाण्यापासून १०० मीटरवर ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे हे शहर खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. …

Read More »

तंत्रशिक्षण दूरस्थ पद्धतीनं देता येणार नाही: SC

नवी दिल्ली। (PNE)- ‘इंजिनीअरिंगसारखे तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दूरस्थ शिक्षण (करस्पाँडन्स) हा पर्याय होऊ शकत नाही,’ असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यामुळं तंत्रशिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रम यापुढं नियमित वर्गांच्या माध्यमातूनच पूर्ण करावे लागणार आहेत. दूरस्थ शिक्षण पद्धतीनं घेतलेली ‘कम्युटर सायन्स’ची पदवी नियमित अभ्यासक्रम पूर्ण करून घेतलेल्या त्याच पदवीच्या …

Read More »