ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / तंत्रशिक्षण दूरस्थ पद्धतीनं देता येणार नाही: SC

तंत्रशिक्षण दूरस्थ पद्धतीनं देता येणार नाही: SC

नवी दिल्ली। (PNE)- ‘इंजिनीअरिंगसारखे तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दूरस्थ शिक्षण (करस्पाँडन्स) हा पर्याय होऊ शकत नाही,’ असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यामुळं तंत्रशिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रम यापुढं नियमित वर्गांच्या माध्यमातूनच पूर्ण करावे लागणार आहेत.
दूरस्थ शिक्षण पद्धतीनं घेतलेली ‘कम्युटर सायन्स’ची पदवी नियमित अभ्यासक्रम पूर्ण करून घेतलेल्या त्याच पदवीच्या समकक्ष धरली जाऊ शकत नाही, असा निकाल दोन वर्षांपूर्वी पंजाब-हरयाणा न्यायालयानं दिला होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरला. त्याचवेळी, दूरस्थ पद्धतीनं तंत्रशिक्षण घेण्यास मंजुरी देणारा ओडिशा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *