ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / गंगास्नानावेळी झाली चेंगराचेंगरी; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री नितीशकुमार?

गंगास्नानावेळी झाली चेंगराचेंगरी; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री नितीशकुमार?

बिहार। (PNE)- कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय येथील सिमरिया घाटावर आज सकाळी गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गंगा नदीच्या घाटावर आज पूजेसाठी आणि स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यात तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर जखमींची संख्याही मोठी आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर इतर भाविकांनीच बचावकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *