ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / हाय व्हॉट्स अप!! ठप्प झालेलं व्हॉट्सअॅप तासाभरानंतर सुरू

हाय व्हॉट्स अप!! ठप्प झालेलं व्हॉट्सअॅप तासाभरानंतर सुरू

नवी दिल्ली ।(PNE)- भारतासह जगभरात तब्बल तासभर ‘डाऊन’ होऊन असंख्य युजर्सचा ‘बीपी अप’ करणारं व्हॉट्सअॅप अखेर सुरू झालं आहे. तासाभरानंतर व्हॉट्सअॅपवरून पुन्हा एकदा संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली असून त्यामुळं युजर्सच्या जीवात जीव आला आहे. व्हॉट्सअॅप अचानक ठप्प होण्याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी दोन वाजल्यापासून व्हॉट्सअॅपवरील एकाही ग्रुपवर नवा संदेश पडत नव्हता. तसंच, पाठवलेला संदेश समोरच्याला मिळतही नव्हता. व्हॉट्सअॅप ठप्प झाल्यामुळं हे होत आहे, याचा अंदाज सुरुवातीला कुणालाही आला नाही. इंटरनेट डाऊन असावं. आपल्या मोबाइलचा प्रॉब्लेम असावा, असाच प्रत्येकाचा समज झाला होता. मात्र, बाकी सर्व गोष्टी ठीक आहेत, तरीही मेसेज येत नसल्याचं समजल्यानंतर ट्विटर व फेसबुकवरून लोकांनी चौकशा सुरू केल्या. काही वेळानंतर #whatsappdown असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला आणि व्हॉट्सअॅप ठप्प झाल्याचा उलगडा झाला.
तब्बल तासभर असा ठप्प अवस्थेत गेला. त्यामुळं युजर्सची अक्षरश: घालमेल झाली. ‘झालं का सुरू? आले का मेसेज?’ अशीच विचारणा एकमेकांकडं सुरू होती. अखेर तासभरानंतर मेसेज धडकू लागले आणि सगळ्यांच्याच जीवात जीव आला. व्हॉट्सअॅप बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबरमध्येही अशाच प्रकारे व्हॉट्सअॅप ठप्प झाले होते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *