ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / संविधान जागर सभा; नाशिकमध्ये कन्हैयाच्या सभेत पाण्याच्या बाटल्यांना बंदी

संविधान जागर सभा; नाशिकमध्ये कन्हैयाच्या सभेत पाण्याच्या बाटल्यांना बंदी

नाशिक। (PNE)-शहरात रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान जागर सभेत पाणी बॉटल्ससह कुठलेही साहित्य नेण्यास बंदी करण्यात आली आहे. सभेत जेएनयू विद्यार्थी संघाचा कन्हैया कुमार भारतीय विद्यार्थी आणि युवकांपुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई नाका येथील तूपसाखरे लॉन्समध्ये दुपारी चार वाजता ही सभा होणार असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
सभेच्या तयारीबाबत आज तूपसाखरे लॉन्समध्ये बैठक झाली. बैठकीला पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह आयोजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहन पार्किंगची व्यवस्था गोल्फ क्लब मैदानावर करण्यात आली आहे. लॉन्समध्ये पाण्याच्या बॉटल्स, बॅग, अनावश्यक साहित्य नेण्यास प्रतिबंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कन्हैयाकुमार यांची सभा यशस्वी करण्यासाठी पोस्टर, फ्लेक्स, पत्रकांद्वारे सुरू असलेल्या प्रसिद्धी मोहिमेचा आढावाही या वेळी घेण्यात आला. सभेसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), छात्रभारती, महाराष्ट्र युवा परिषद, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), सम्यक विद्यार्थी आंदोलन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ), शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच, प्रगतिशील लेखक संघ इत्यादी आयोजक संघटना आणि सभेला पाठिंबा देणाऱ्या अखिल भारतीय समता परिषद, रिपब्लिकन आंबेडकर चळवळ, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती, आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना आदी प्रयत्नशील आहेत. बैठकीला राकेश पवार, विराज देवांग, अॅड. राजपालसिंग शिंदे, किरण मोरे, चेतन गांगुर्डे, मिलिंद सावंत, विनय कटारे, संतोष सोनपसारे, शशीभाई उन्हवणे, विशाल रनमाळे, अपूर्व इंगळे, अशोक राबडे, शरद कोकाटे, नितीन मते, दीपक देवरे, करुणासागर पगारे, राजू देसले, दत्तू तुपे आदी उपस्थित होते. सोशल मीडियाद्वारे धमक्या देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती या वेळी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *