ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पोलिसाच्या मुलीवर ३ तास सामूहिक बलात्कार

पोलिसाच्या मुलीवर ३ तास सामूहिक बलात्कार

भोपाळ। (PNE)- महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजले जाणारे मध्य प्रदेशातील भोपाळ शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या १९ वर्षांच्या मुलीवर चौघांनी तीन तास बलात्कार केला. पोलीस ठाण्यापासून १०० मीटरवर ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे हे शहर खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वडील पोलीस उपनिरीक्षक तर आई गुन्हे अन्वेषण विभागात नोकरी करते. ही तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. ती मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास क्लासवरून घरी परतत होती. त्यावेळी आरोपी गोलू बिहारी चाधर याने तिचा हात पकडला. तिने प्रतिकार करत लाथ मारली आणि त्याला ढकलून दिले. चिडलेल्या गोलूने अमर घुंटू या साथीदाराला बोलावले. दोघांनी तिला पकडून रेल्वेरुळालगतच्या नाल्याकडे फरफटत नेले. त्यांनी तिला जबर मारहाण केली आणि रेल्वेरुळालगतच्या पुलाखाली नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गुटखा आणि सिगारेट आणण्यासाठी गोलू निघून गेला. तर अमर तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी थांबला. गोलूने येताना राजेश आणि रमेश या आपल्या दोन मित्रांना सोबत आणले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. हे चौघेही गुटखा, सिगरेट आणि चहासाठी ब्रेक घेत होते आणि तिच्यावर अत्याचार करत होते.

घटनेनंतर ती कशीबशी हबीबगंज रेल्वे स्थानकातील पोलीस चौकीत पोहोचली. तेथून तिने आपल्या पालकांना फोन केला आणि बोलावून घेतले. मुलीची अवस्था बघून ते तिला घरी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एमपी नगर पोलीस ठाणे गाठले. आपल्या हद्दीत हा प्रकार घडला नसल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना हबीबगंज पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. तेथील पोलिसांनीही त्यांनी हबीबगंज रेल्वे पोलिसांकडे जाण्यास सांगितले. तेथे तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता ‘फिल्मी स्टोरी’ सांगत आहे का, असे म्हणून पोलिसांनी तिची थट्टा केली. अखेर पालकांनी पोलीस उपमहानिरीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी संबंधित पोलिसांना घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *