ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला;

सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला;

बेळगाव। (PNE)- ‘जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारताचाच भाग राहणार आहे. सोशल मीडियामुळे दहशतवादाचे प्रकार वाढले आहेत,’ असे मत लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे झालेल्या शानदार समारंभात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते २३ आणि २४ मराठा बटालियनला राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करण्यात आला.
रावत म्हणाले, ‘शेजारी राष्ट्राकडून घुसखोरीला मदत मिळते. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक डोंगर आहेत. घनदाट जंगल आहे. अनेक नद्या नाले तेथून वाहतात, त्यामुळे तेथे घुसखोरी होते. तरुणांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांची डोकी भडकावली जातात. सोशल मीडियामुळेमुळे हे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे काश्मीरमधील हिंसाचारात चढ-उतार दिसून येतात. अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी केवळ मनुष्यबळ असून, चालणार नाही तर मनुष्यबळ अर्थात सैन्य आणि आधुनिक उपकरणे यांचा वापर केल्यामुळे अतिरेक्यांच्या घुसखोरी रोखता येतील. सरकारने यासाठी निधीही दिलेला आहे. कमांडर्स त्या निधीचा वापर करून आवश्यक अत्याधुनिक उपकरणे घेऊ शकतात. जम्मू काश्मीरमधील लोक आपले आहेत. सेनादल त्यांच्याशी अत्यंत चांगल्या पद्धतीने वागते.’ डोकलाम विषयी बोलताना रावत म्हणाले, आता दोन्ही बाजूनी आपले सैन्य मागे घेतले आहे. आपण आपल्या हद्दीत आहोत, ते त्यांच्या हद्दीत आहेत

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *