ताज़ा खबरे

उंदीर 75 पैशाला मिळत असताना पालिका 138 रुपये का मोजते? – संजोग वाघेरे

पिंपरी। (PNE)- पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सापांसाठी हापकीन ही संस्था 75 पैसे या दराने उंदीर देण्यास तयार असताना पालिका प्रशासन जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून 138 रुपयाला एक उंदीर कशासाठी खरेदी करते? असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी उपस्थित केला. या सर्व …

Read More »

गॅरेज मालकास जातीवाचक अपशब्द व मारहाणप्रकरणी तिघां विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पिंपरी। (PNE)- गॅरेजमध्ये डॉ. आंबेडकर व गौतम बुद्धाचे फोटो का लावले अशी विचारणा करत गॅरेज मालकास तिघांनी मारहाण व जातीवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील झिंजुर्डे, सुधीर झिंजुर्डे व एक अनोळखी इसम यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन मल्लिकार्जून …

Read More »

‘नदी वाचवा–जीवन वाचवा’; जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा ‘वसुंधरा’ सन्मान

– निगडीत 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिंपरी। (PNE)- निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि वसुंधरा क्लब पुणे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पर्यावरण विषयक विविध लघुपट, अनुबोधपट प्रदर्शित केले …

Read More »

‘पुणे मेट्रो’च्या फेसबुक पेजला दहा महिन्यात दोन लाख ‘लाईक’

पिंपरी। (PNE)- ‘महामेट्रो’च्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या फेसबुक पेजने दहा महिन्यात तब्बल दोन लाख लाईक्सचा टप्पा पार केला आहे. नागरिकांचा मेट्रो प्रकल्पास पाठिंबा मिळत असल्याचे हे निदर्शक असून या प्रकल्पाबद्दल असलेली उत्सुकताही त्यातून प्रतीत होत आहे, अशा शब्दांत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुणे मेट्रो …

Read More »

कार्तिकीसाठी लाखो भाविकांची पंढरीत मांदियाळी; बस कंडक्टर ठरला मानाचा वारकरी

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आज पांढरी नगरीत सहा लाख भाविक दाखल झाले असून आज पहाटे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी कर्नाटकातील विजापूर येथील बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्यांचा मान मिळाला. कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये चालक असलेल्या चव्हाण यांनी महाराष्ट्रातील एसटी …

Read More »

आठ महिन्यात वृक्षांच्या आत्महत्या वाढल्यात का ?- चेतन तुपे

पुणे: पुणे महापालिका परिसरात गेल्या आठ महिन्यात झाडे उन्मळून पडण्याच्या इतक्या घटना घडल्या आहेत की त्यामुळे भाजप सरकारने नव्याने आणलेला जीएसटी रेरा कायद्यामुळे झाडे आत्महत्या करत आहेत का, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मुख्यसभेत उपस्थित केला. शहरातील बेकायदा वृक्षतोडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यसभेमध्ये आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते …

Read More »

भाजप जाहिरातबाज आणि जुमलेबाज सरकार- सुप्रिया सुळे

पुणे: केंद्रात आणि राज्यात असलेले भाजपचे सरकार हे फक्त जाहिरातबाज आणि जुमलेबाज सरकार असून हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका भवनात झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये केली आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांना मूलभूत …

Read More »

पुणे विभागातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत उद्यापासून बदल; प्रशासनाचा निर्णय

पुणे : भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकात १ नव्हेंबरपासून बदल होत असून पुणे विभागातील काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे़ त्यात पुण्याहून सुटणारी पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस (११००८) ही गाडी आता दुपारी १५. ३० ऐवजी १५ मिनिटे अगोदर १५़. १५ वाजता सुटणार आहे़ मुंबईला ही गाडी १९. ३५ ऐवजी १९. १७ वाजता पोहचेल़याशिवाय …

Read More »

वल्लभभाई पटेलांमुळे देशाची अखंडता; आयुक्‍त श्रावण हर्डीकर

पिंपरी– देशाची अखंडता राखण्याचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले असून देशभरात त्यांच्या जयंतीनिमीत्त एकता दौड आयोजित केली जाते. ही दौड देशातील राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मदत करीत असून यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होत आहे. त्यामुळे हा देश एक राहिल, देशाची अखंडता कायम राहणार असून कोणतीही शक्ती देशात …

Read More »

महामेट्रोला हवी पालिकेची मोकळी जागा; मेट्रोलगत पाच ठिकाणी होणार पार्किंग!

पिंपरी– पीएमपीएमएल बस प्रवासी वाहतूक सेवा सक्षम नसल्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. भविष्यात स्टेशनवरून मेट्रोने प्रवास करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची खासगी वाहने सुरक्षीत ठेवण्यासाठी पुणे महामेट्रो व्यवस्थापनाच्या वतीने पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गालगत पाच ठिकाणी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी महामेट्रोने वाहनतळ अथवा अन्य नियोजित प्रकल्पांसाठीच्या आरक्षीत मोकळ्या जागेची मागणी केली …

Read More »