ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / उंदीर 75 पैशाला मिळत असताना पालिका 138 रुपये का मोजते? – संजोग वाघेरे

उंदीर 75 पैशाला मिळत असताना पालिका 138 रुपये का मोजते? – संजोग वाघेरे

पिंपरी। (PNE)- पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सापांसाठी हापकीन ही संस्था 75 पैसे या दराने उंदीर देण्यास तयार असताना पालिका प्रशासन जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून 138 रुपयाला एक उंदीर कशासाठी खरेदी करते? असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकारामध्ये संबंधितांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत आयुक्तांनी प्राणी संग्रहालयातील अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वाघेरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे. वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्राणी संग्रहालयातील सापांसाठी खाद्य म्हणून पालिकेतर्फे उंदरांची खरेदी केली जाते. शहरातीलच हाफकिन ही संस्था एक उंदीर 75 पैशात देण्यासाठी तयार असताना जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून तब्बल 138 रुपयाला एक उंदीर खरेदी करण्यात येत आहे.
यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप त्यांनी केली. याशिवाय बहिणाबाई प्राणी संग्रहालयात पालिकेने अद्यापही ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले नाहीत. त्यामुळे येथील अजगर, मगरीची पिल्ले, मांडूळ यासारख्या प्राण्यांची चोरी झाली आहे. यासारख्या घटना थांबविण्यासाठी सुरक्षारक्षकांची, ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांची गरज असताना इतर गोष्टींवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *