ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / वल्लभभाई पटेलांमुळे देशाची अखंडता; आयुक्‍त श्रावण हर्डीकर

वल्लभभाई पटेलांमुळे देशाची अखंडता; आयुक्‍त श्रावण हर्डीकर

पिंपरी– देशाची अखंडता राखण्याचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले असून देशभरात त्यांच्या जयंतीनिमीत्त एकता दौड आयोजित केली जाते. ही दौड देशातील राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मदत करीत असून यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होत आहे. त्यामुळे हा देश एक राहिल, देशाची अखंडता कायम राहणार असून कोणतीही शक्ती देशात दुरावा निर्माण करू शकणार नाही, असा विश्‍वास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी देशभरात सर्वत्र एकता दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या वतीने आज मंगळवार (दि. 31) सकाळी साडेसहा वाजता एकता दौडचे घेण्यात आली. चिंतामणी चौक ते भेळ चौक, प्राधिकरण अशा एक भारत-श्रेष्ठ भारत, या एकता दौडचा प्रारंभ आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याहस्ते हिरवे निशान दाखवून चिंतामणी चौक येथून करण्यात आला. यावेळी एकता दौडसाठी उपस्थित नागरिकांना आयुक्त हार्डीकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या कार्यक्रमास स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर चंद्रकांत कुलकर्णी, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक ऍड. मोरेश्वर शेडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, माधुरी कुलकर्णी, उद्योजक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, बिभीषण चौधरी, शंकर पाटील, रुपेश पाटील, दिपक महाजन, प्रदिप पटेल, भुषण पाटील, प्रमोद चौधरी, अनुप मोरे, प्रवीण पाटील, किरण चौधरी, रविंद्र बऱ्हाटे, डॉ. प्रशांत पाटील, किरण पाचपांडे, गौरी सरोदे, निना खर्चे, दत्ता पाटील उपस्थित होते.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *