ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / भाजप जाहिरातबाज आणि जुमलेबाज सरकार- सुप्रिया सुळे

भाजप जाहिरातबाज आणि जुमलेबाज सरकार- सुप्रिया सुळे

पुणे: केंद्रात आणि राज्यात असलेले भाजपचे सरकार हे फक्त जाहिरातबाज आणि जुमलेबाज सरकार असून हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका भवनात झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये केली

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांना मूलभूत सुविधा पुरवितांना पाणी, कचरा, रस्ते याचे नियोजन महापालिका कसे करणार या बाबतीत चर्चा करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक सचिन दोडके, युवराज बेलदरे, रुपाली चाकणकर, शुक्राभाऊ वांजळे, प्रवीण कामठे, अनिताताई इंगळे, सुधीर कोंढरे, सुरेश गुजर, स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन तीन वर्षांचा कालावधी होऊन गेला. मात्र कोणत्याही कामात हे सरकार यशस्वी झाले नाही.कर्जमाफी ही सरकारचे सर्वात मोठे अपयश असून राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्याचे पैसे दिवाळीमध्ये प्रत्येक शेतकयांच्या खात्यावर जमा होतील अशी घोषणा करण्यात आली. मात्र अद्याप एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. तसेच पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश केला. मात्र त्या प्रकल्पाचे काय झाले, असा सवाल उपस्थित करीत हे सरकार म्हणजे जुमले की सरकार अशा शब्दात भाजपवर त्यांनी निशाणा साधला.

त्या पुढे म्हणाल्या की, समाविष्ट गावांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. या बजेटमध्ये पहिल्यांदा गावाच्या कामांना निधी ठेवला नाही. यासाठी सरकारने एक समिती स्थापन करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून रिंग रोडसाठी जागा संपादन करणार कधी आणि अजूनही कचरा प्रकल्प प्रलंबित आहे, या बाबत चिंता वाटते असे त्या म्हणाल्या.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *