ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘पुणे मेट्रो’च्या फेसबुक पेजला दहा महिन्यात दोन लाख ‘लाईक’

‘पुणे मेट्रो’च्या फेसबुक पेजला दहा महिन्यात दोन लाख ‘लाईक’

पिंपरी। (PNE)- ‘महामेट्रो’च्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या फेसबुक पेजने दहा महिन्यात तब्बल दोन लाख लाईक्सचा टप्पा पार केला आहे. नागरिकांचा मेट्रो प्रकल्पास पाठिंबा मिळत असल्याचे हे निदर्शक असून या प्रकल्पाबद्दल असलेली उत्सुकताही त्यातून प्रतीत होत आहे, अशा शब्दांत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पासंबंधी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी 24 डिसेंबर, 2016 रोजी महामेट्रोचे संकेतस्थळ, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब या समाजमाध्यमांवर या प्रकल्पाचे खाते सुरु करण्यात आले. महामेट्रोच्या फेसबुक पेजचा प्रतिसाद दर हा 100 टक्के असून, त्यावर आलेल्या कोणत्याही संदेशाला 45 मिनिटांच्या आत प्रतिसाद दिला जातो. या पेजवरून प्रकल्पाची माहिती, दैनंदिन कामाची माहिती, वाहतूक मार्ग बदलाविषयीचे नियोजन याविषयी मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून नागरिकांशी संवाद साधला जातो. फेसबुकच्या सर्वेक्षणानुसार हे पेज पुणे शहरातील सर्वाधिक पसंतीच्या पेजपैकी एक असल्याचेही पुणे मेट्रोकडून सांगण्यात आले.

समाजमाध्यम हे नागरिकांना जोडण्याचे महत्त्वाचे माध्यम असल्याचा विश्वास डॉ. दीक्षित यांनी या निमित्ताने बोलताना व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, पुणे मेट्रो प्रकल्पाविषयी नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी समाजमाध्यमांचा एक व्यासपीठ म्हणून सक्रिय वापर करण्याची आवश्यकता आहे. त्यासंबंधी तोडगा काढण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न महामेट्रोच्या वतीने करण्यात येतील. महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पापाठोपाठ ही योजना पुणे मेट्रोसाठी राबविण्यात आली आहे. लाईक्सच्या बाबतीत नागपूर मेट्रोचे फेसबूक पेज आज देशात दुस-या क्रमांकावर आहे.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सोशल मीडियाची सांकेतिक स्थळे :

Facebook: @MetroRailPunehttps://www.facebook.com/metrorailpune

Twitter: @MetroRailPunehttps://twitter.com/metrorailpune

Google+: @PuneMetroRailProjecthttps://plus.google.com/u/0/+PuneMetroRailProject

YouTube: @PuneMetroRailProjecthttps://www.youtube.com/c/PuneMetroRailProject

Website: http://punemetrorail.org/

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *