ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पुणे विभागातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत उद्यापासून बदल; प्रशासनाचा निर्णय

पुणे विभागातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत उद्यापासून बदल; प्रशासनाचा निर्णय

पुणे : भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकात १ नव्हेंबरपासून बदल होत असून पुणे विभागातील काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे़ त्यात पुण्याहून सुटणारी पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस (११००८) ही गाडी आता दुपारी १५. ३० ऐवजी १५ मिनिटे अगोदर १५़. १५ वाजता सुटणार आहे़ मुंबईला ही गाडी १९. ३५ ऐवजी १९. १७ वाजता पोहचेल़याशिवाय पुणे -इंदौर (२२९४३) ही आठवड्यात पाच दिवस चालणारी तसेच पुणे -जयपूर (१२९३९) ही आठवड्यात दोन दिवस चालणारी एक्सप्रेस दुपारी १५़. २० ऐवजी १५ मिनिटे उशीरा १५. ३५ वाजता सुटणार आहे़

दौंड -पुणे डेमू  (७१४०८) ही दौंडवरुन १२़.४५ वाजता सुटून पुणे स्टेशनवर आता १४.२३ वाजता पोहचेल़ पुणे -दौंड (७१४०९) ही डेमू पुणेहून १४़२० निघण्याऐवजी १४़४० वाजता सुटेल व दौंडला १६ .५८ वाजता पोहचेल़ दौंड -पुणे (७१४१०) डेमू दौंडहून १७. १० वाजता सुटून पुणे स्टेशनवर १८. ५० वाजता पोहचेल़

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *