ताज़ा खबरे

भारतीय महिला हॉकी संघाची चीनवर मात, आशिया चषक जिंकला

काकामिगहारा (जपान)। चीनचा धुव्वा उडवत भारतीय महिला हॉकी संघाने महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. जपानमधील काकामिगहारा येथे झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने चीनचा ५-४ असा शूटआउटमध्ये पराभव करत ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरला …

Read More »

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव

नागपूर। (PNE)- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची धनगर समाजाची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात केली. यावेळी उपस्थितांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत मुख्यमंत्र्यांच्या मागणीचं जल्लोषात स्वागत केलं. …

Read More »

पदमावती: मंत्री म्हणाले, ‘आणखी सहन करणार नाही’

नवी दिल्ली। (PNE)- केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी ‘पद्मावती’ चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांनीही ‘पद्मावती’ चित्रपटावरून बॉलिवूड निर्मात्यांवर हल्लाबोल केला आहे. ‘बॉलिवूड निर्माते हिंदू गुरू, देवी-देवतांवर तसेच योद्ध्यांवर चित्रपट बनवतात. आता यापुढे आम्ही आणखी सहन करणार नाही’, असे म्हणत, ‘काय, इतर धर्मांवर …

Read More »

कोणताही ‘पंजा’ गरिबांचा हक्क हिरावू शकत नाही; पंतप्रधान मोदी यांची कॉंग्रेसवर टीका

ऊना। (PNE)- ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे, दिल्लीतून एक रूपया मंजूर झाला तर गावांमध्ये जाईपर्यंत लोकांच्या हातात केवळ १५ पैसेच पोहचतात. मला सांगा, लोकांचे पैसेमध्येच जिरवणारा हा ‘पंजा’ कुणाचा होता? देशात इतकी वर्ष कुणाचं सरकार होतं? या भ्रष्टाचाराला कोण जबाबदार आहे?’ असे सवाल करतानाच ‘आम्ही गरिबांना त्यांच्या हक्काचा पूर्ण रूपया देण्याचा …

Read More »

पोकळ भाषणं पुरे, आता खुर्च्या खाली करा; पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी यांचा घणाघात

नवी दिल्ली।(PNE)- गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना काँग्रेसने अधिक आक्रमक होत सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर सोशल मीडियावरून भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. ‘पोकळ भाषणं पुरे झाली. देशातील महागाई आणि बेरोजगारी नियंत्रित करा अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा शब्दात …

Read More »

सोलापुरात ऊस आंदोलन पेटलं; शेतकरी रस्त्यावर उतरले

सोलापूर। (PNE)- ऊस दराबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त झालेले ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज शेतकऱ्यांनी सोलापूरमध्ये जागोजागी ऊसाचे ट्रॅक्टर अडवून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त आंदोलकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले तर सांगलीच्या म्हैसाळ येथे काही आंदोलकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायरच पळवले. दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर येथील शासकीय …

Read More »

तामिळनाडूत पूर, शाळा-महाविद्यालये, 600 कोटी रुपयांचे प्रकल्प ठप्प

चेन्नई।(PNE) –तामिळनाडूत चेन्नईसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांत सलग पाचव्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चेन्नईत चोवीस तासांत २०२ मिमी पावसाची नोंद झाली. १ डिसेंबर २०१५ नंतरच्या पुरानंतरचा हा एका दिवसातील पावसाचा नवा विक्रम आहे. कांचीपुरममध्ये सर्वाधिक ६२७ मिमी पाऊस झाला. राज्यात शुक्रवारी १९३ मिमी पाऊस झाला. किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती …

Read More »

गंगास्नानावेळी झाली चेंगराचेंगरी; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री नितीशकुमार?

बिहार। (PNE)- कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय येथील सिमरिया घाटावर आज सकाळी गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गंगा नदीच्या घाटावर आज पूजेसाठी आणि स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला. त्यानंतर चेंगराचेंगरी …

Read More »

भाजपकडे माझी बनावट सेक्स सीडी; हार्दिक पटेलचा घणाघाती आरोप

अहमदाबाद। (PNE)- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. माझी बदनामी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी माझी बनावट सेक्स सीडी तयार केली आहे, असा दावा त्याने केला आहे. राज्यात निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी …

Read More »

इत्तफाकः ‘योगायोगा’चा जमलेला थरार सिनेरिव्ह्यू

सस्पेन्स थ्रिलर दोन प्रकारचे असतात. एखाद्या रहस्याची उकल करण्यासाठी ढीगभर पात्रं समोर असतात, संशयाची सुई सतत एकाकडून दुसऱ्याकडे फिरत असते आणि सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली व्यक्तीच गुन्हेगार म्हणून पुढे येते. तर, दुसऱ्या प्रकारच्या ‘सस्पेन्स थ्रिलर’मध्ये मोजक्याच व्यक्तिरेखा असतात. घडलेल्या घटनेची प्रत्येकाची आपापली ‘व्हर्जन’ असतात. मात्र, सत्य एकच असते. रहस्य उलगडण्याच्या …

Read More »