ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव

नागपूर। (PNE)- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची धनगर समाजाची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात केली. यावेळी उपस्थितांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत मुख्यमंत्र्यांच्या मागणीचं जल्लोषात स्वागत केलं.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची फार पूर्वीपासूनची मागणी होती. मधल्या काळात या विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर यांचं नाव देण्याची मागणीही पुढे आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याच्या मागणीवर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान, हा मेळावा सुरू असताना धनगर समाजातील तरुणांनी धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री फडणवीस भाषणाला उभे राहिले तेव्हा ‘क्या हुआ तेरा वादा’ आणि ‘ये कहाँ आ गये हम’ ही हिंदी गाणी वाजवून त्यांना आरक्षणाची जाणीव करून दिली. मात्र मुख्यमंत्र्यांनीही ‘मी वादा विसरलेलो नाही. तुम्हाला आरक्षण देणारचं,’ असं सांगून वेळ मारून नेली. ‘आघाडी सरकारच्या चुकीमुळे धनगर आरक्षण रखडलं. मात्र आम्ही नव्याने अहवाल तयार करुन केंद्राकडे पाठवणार आहोत. डिसेंबर २०१७ मध्ये हा अहवाल येईल’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *