ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / सोलापुरात ऊस आंदोलन पेटलं; शेतकरी रस्त्यावर उतरले

सोलापुरात ऊस आंदोलन पेटलं; शेतकरी रस्त्यावर उतरले

सोलापूर। (PNE)- ऊस दराबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त झालेले ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज शेतकऱ्यांनी सोलापूरमध्ये जागोजागी ऊसाचे ट्रॅक्टर अडवून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त आंदोलकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले तर सांगलीच्या म्हैसाळ येथे काही आंदोलकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायरच पळवले. दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व साखर कारखानदारांची थोड्याच वेळात बैठक होणार असून त्यात ऊसप्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं सुत्रांनी सांगितलं.
खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन पुकारलं. गुरुवारी राज्यसरकारबरोबरची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत पंढरपूर-पुणे रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले. फॅबकेट शुगर फॅक्टरीकडे हा ट्रॅक्टर ऊस घेऊन निघाला होता.
सांगलीतही या आंदोलनाचे पडसाद उमटले. म्हैसाळमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर पळवले.काल मध्यरात्री हा प्रकार घडला. जोपर्यंत ऊसाला टनामागं ३ हजार ५०० रुपयांचा दर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचं शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *