ताज़ा खबरे
Home / खेल / भारतीय महिला हॉकी संघाची चीनवर मात, आशिया चषक जिंकला

भारतीय महिला हॉकी संघाची चीनवर मात, आशिया चषक जिंकला

काकामिगहारा (जपान)। चीनचा धुव्वा उडवत भारतीय महिला हॉकी संघाने महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. जपानमधील काकामिगहारा येथे झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने चीनचा ५-४ असा शूटआउटमध्ये पराभव करत ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
यापूर्वी भारताने २००४मध्ये जपानवर १-० अशी मात करत हा प्रतिष्ठीत किताब आपल्या नावे केला होता. आज दुसऱ्यादा हा किताब पटकावत भारतीय संघाने २००९मध्ये याच स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
आज झालेल्या अंतिम सामन्यात भारत आणि चीनदरम्यान अटीतटीची लढत पाहायला मिळाली. फायनल टाइम संपेपर्यंत स्कोअर १-१ असा बरोबरीत होता. त्यानंतर सामन्याचा निकाल लावण्यासाठी हा सामना शूटआउटपर्यंत पोहोचला. भारतीय महिलांनी उत्तम समन्वयाचे दर्शन घडवत आणि अचूक रणनीती आखत चीनचा ५-४ने पराभव करत आजचा इतिहास रचला.

Check Also

देश में लागू हुआ सीएए,केंद्र सरकार का नोटिफिकेशन जारी

तीन देशों के गैर मुस्लिम शरणार्थियों को मिलेगी नागरिकता नई दिल्ली-केंद्र की मोदी सरकार ने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *