ताज़ा खबरे

हिवाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

मुंबई: हिवाळा सुरु झालेला असतानाच आज सकाळी मुंबई उपनगरांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. डोंबिवलीतही ढगाळ वातावरण आहे. नवी मुंबईतील अनेक भागांत पावसाचा शिडकावा झाला. रायगड जिल्ह्यातील रोहा, पेण, पनवेल आदी भागांतही पावसाने हजेरी लावली. …

Read More »

‘इफ्फी’वर बहिष्कार टाकाः शबाना आझमी

मुंबईः दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना येत असलेल्या धमक्यांविरोधात सर्व कलाकारांनी एकत्र येत ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकावा, असं आवाहन अभिनेत्री शबाना आझमी यांनी केलं आहे. एकीकडे ‘पद्मावती’ चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे, चित्रपटातील कलाकारांना, दिग्दर्शकाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तर दुसरीकडे मात्र गोव्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची …

Read More »

मला ‘कास्टिंग काउच’चा सामना करावा लागला नाही: सनी

मुंबई: हॉलिवूडमधील निर्माते हार्वी वाइनस्टीनवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारही या मुद्द्यावर जाहीरपणे बोलू लागले. अभिनेत्री विद्या बालनपासून टिस्का चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्री आपले कटू अनुभव सांगत असताना अभिनेत्री सनी लिओनीनं मात्र वेगळं मत मांडलय. ‘बॉलिवूडमध्ये मला कधीच लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला नाही,’ असं सनीनं सांगितलंय. तिनं या गोष्टींचं …

Read More »

‘स्मार्ट सिटी अभियानासाठी स्वतंत्र सेलची स्थापना

पिंपरी: स्मार्ट सिटी अभियानांतर्गतचे कामकाज विहित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ सेलची स्थापना करण्यात आली आहे. सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर हे तर सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण कामकाज पाहणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अख्यत्यारित …

Read More »

आता गुगल मॅपवर दिसणार शहरातील सार्वजनिक शौचालये

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने आणखी एक हायटेक पाऊल उचलले असून महापालिकेने शहरातील 535 स्वच्छता गृहांचे गुगल मॅपिंग केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता एका क्लिकवर शहरातील त्यांच्या परिसरातील स्वच्छता गृह दिसणार आहे. केंद्र शासनाचे शहरी विकास मंत्रालयाने देशातील निवडक शहरामध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये यामध्ये पेट्रोलपंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बस स्टँड याचे …

Read More »

नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पवनामाई स्वच्छतेला सुरुवात

पिंपरी: पवनामाईतील जलपर्णी काढण्यासाठी शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असून आज (रविवारी) वाल्हेकरवाडी घाटावर सर्वांच्या सहभागातून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन,जलमैत्री अभियान भावसार व्हिजन इंडिया, आणि पीसीसीएफ या संस्था, स्थानिक नगरसेवक, व नागरिकांनी सहभाग घेतला होता. गणेश विसर्जनानंतरच पवना नदीची …

Read More »

हिंदू धर्मातील परंपरा आणि आस्थांविषयी विकृत दृश्ये दाखवणा-या चित्रपटांना रोखा

दशक्रिया चित्रपटात हिंदू धर्म, ब्राह्मण समाज यांवर टीका दाखवण्यात आली आहे. पुरोहित समाज आपणहून विधी करायला बोलावत नाही. अशा प्रकारे खोटा प्रसार करून हिंदू धर्माची विटंबना करणे गैरच आहे. अशा पद्धतीने हिंदू धर्मातील परंपरा आणि हिंदूंच्या आस्थांविषयी विकृत दृश्ये दाखवणा-या चित्रपटांना रोखा, अशी एकमुखी मागणी वारकरी महाअधिवेशनात वारक-यांनी केली. हिंदू …

Read More »

चिखली येथील मीराबाई काळे बेपत्ता

पिंपरी- चिखली येथील मीराबाई काळे (वय-50) या दि. 6 नोव्हेंबरपासून शिवाजीनगर, पुणे येथून बेपत्ता झाल्या आहेत. मीराबाई यांची उंची 5.3 इंच आहे. रंग गोरा व बांधणी सडपातळ आहे. मुलगा अमोल पांडूरंग काळे हे टाटा मोटर्समध्ये सध्या नोकरी करत आहेत. त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास 9657961570, 9518565098 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे …

Read More »

भारत फोर्ज कंपनीसमोर कामगारांचे कुटूंबियांसह आंदोलन

पुणे। मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी (15 नोव्हेंबर) पाच कामगारांना तडकाफडकी बडतर्फ केल्याच्या कारणावरून भारत फोर्ज कर्मचारी संघटनेतील सभासदांनी दुपारी 3 ते रात्रीचे 2 वाजेपर्यंत कंपनीच्या आवारामध्येच ठिया आंदोलन केले. यावेळी श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली आणि सदर पाच …

Read More »

‘केएसबी’ चौकातील ग्रेडसेपरेटरला अण्णासाहेब पाटील यांचे नाव द्या; इरफान सय्यद यांची मागणी

– महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांना निवेदन पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने के. एस. बी चौकात बांधण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटला माथाडी कामगारांचे दैवत कै. आण्णासाहेब पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे. याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन …

Read More »