ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / मला ‘कास्टिंग काउच’चा सामना करावा लागला नाही: सनी

मला ‘कास्टिंग काउच’चा सामना करावा लागला नाही: सनी

मुंबई: हॉलिवूडमधील निर्माते हार्वी वाइनस्टीनवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारही या मुद्द्यावर जाहीरपणे बोलू लागले. अभिनेत्री विद्या बालनपासून टिस्का चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्री आपले कटू अनुभव सांगत असताना अभिनेत्री सनी लिओनीनं मात्र वेगळं मत मांडलय. ‘बॉलिवूडमध्ये मला कधीच लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला नाही,’ असं सनीनं सांगितलंय. तिनं या गोष्टींचं श्रेय तिच्या पतीला आणि टीमला दिलंय.
इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाविषयी बोलताना तिनं हा अनुभव शेअर केलाय. ‘इंडस्ट्रीमध्ये लैंगिक शोषण केलं जातं हे खरं असलं तरी मला कधीच अशा शोषणाला सामोरं जावं लागलं नाही. माझे पती डॅनियल वेबर आणि माझी सगळी टीम नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याने मला कधीच असे अनुभव आले नाहीत,’ असे ती म्हणाली.
‘इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाविषयी आवाज उठवल्यानं इतर तरुणींना आणि महिलांना हिंमत मिळेल. एक दिवस असा येईल जेव्हा इंडस्ट्री लैंगिक शोषणापासून मुक्त होईल, असा विश्वासही तिनं व्यक्त केला.

Check Also

अभिनेता सुशांत सिंह राजपुत फांसी लगाकर आत्महत्या की

मुंबई- बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है। मशहूर एक्टर सुशांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *