ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / भारत फोर्ज कंपनीसमोर कामगारांचे कुटूंबियांसह आंदोलन

भारत फोर्ज कंपनीसमोर कामगारांचे कुटूंबियांसह आंदोलन

पुणे। मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी (15 नोव्हेंबर) पाच कामगारांना तडकाफडकी बडतर्फ केल्याच्या कारणावरून भारत फोर्ज कर्मचारी संघटनेतील सभासदांनी दुपारी 3 ते रात्रीचे 2 वाजेपर्यंत कंपनीच्या आवारामध्येच ठिया आंदोलन केले. यावेळी श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली आणि सदर पाच कामगारांचे निलंबन तुर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.
भारत फोर्ज कंपनीतील काही कामगारांनी एकत्र येत काही दिवसांपुर्वी “भारत फोर्ज कर्मचारी संघटना” स्थापन केली. या संघटेनेचे प्रमाणपत्र देण्यासाठी काही कर्मचारी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे गेले असता व्यवस्थापनाने कुठलीही पूर्व सुचना न देता संघटनेच्या 9 पदाधिका-यांचे तडकाफडकी निलंबन केले. या पदाधिका-यांचे निलंबन मागे घ्यावे आणि कंपनीच्या मनमानी कारभारापासून उर्वरीत कामगारांची सुटका करावी, या मागणीसाठी कामगारांनी मुंबईत जाऊन कामगार आयुक्तांची भेट घेत त्यांनी निवेदन दिले. त्यानंतर राळेगणसिध्दी येथे जाऊन अण्णा हजारे यांच्याकडेही आपल्या वेदना मांडल्या, परंतू अद्याप या सर्व वादावर तोडगा निघाला नाही.
संघटनेचे अध्यक्ष कृष्णात शिंदे यांनी बोलताना म्हणाले, भारत फोर्ज कंपनी कर्मचा-यांचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला. कर्मचारी अनेक वर्षापासून पगारातील तफावत, नोकरीची असुरक्षितता, कामादरम्यान केले जाणारे दबावतंत्र,सुविधांचा अभाव अशा अनेक अडचणींना तेथील कर्मचारी तोंड देत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *