ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘केएसबी’ चौकातील ग्रेडसेपरेटरला अण्णासाहेब पाटील यांचे नाव द्या; इरफान सय्यद यांची मागणी

‘केएसबी’ चौकातील ग्रेडसेपरेटरला अण्णासाहेब पाटील यांचे नाव द्या; इरफान सय्यद यांची मागणी

– महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांना निवेदन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने के. एस. बी चौकात बांधण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटला माथाडी कामगारांचे दैवत कै. आण्णासाहेब पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे.
याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची ओळख औद्योगिकनगरी अशी आहे. शहरात विविध क्षेत्रात काम करणा-या कामगारांसोबत माथाडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊनच पालिकेने माथाडी कामगारांचे आराध्य दैवत आमदार कै. आण्णासाहेब पाटील यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. के.एस.बी. चौकाची ओळख अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा चौक अशी निर्माण झाली आहे.
काबाडकष्टाने आणि अंगमेहनतीने जीवन जगणा-या राज्यातील लाखो माथाडी कामगारांच्या जीवनास स्थिरता व स्थैर्य कै. अण्णासाहेब पाटील यांनी मिळवून दिले. कष्टक-यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. गोरगरीब कष्टकरी माथाडी, मापाडी व हमाल अशा कामगारांसाठी त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. माथाडी कामगारांना एकत्र आणून त्यांच्या आर्थिक सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल करणारा माथाडी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी मोलाचे योगदान आहे. माथाडी, मापाडी व कष्टकरी कामगार यांना ख-या अर्थाने न्याय देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने बनविण्यात येणा-या ग्रेडसेपरेटरला माथाडीचे आराध्य दैवत कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष किसान बावकर, सचिव प्रवीण जाधव, खंडू गवळी, सर्जेराव कचरे, भिवाजी वाटेकर, ज्ञानोबा मुजुमले, मुरलीधर कदम, पांडुरंग कदम, राजू तापकीर, सुनील सावळे, ओमकार माने, सतीश कंटाळे, मारुती वाळुंज, बालाजी खैरे, समर्थ नाईकवडे, नागेश वनवटे, राहूल कोलटकर, पांडुरंग काळोखे उपस्थित होते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *