ताज़ा खबरे
Home / राष्ट्रीय (page 42)

राष्ट्रीय

काश्मीर: लष्काराने ३ दहशतवाद्यांना जिवंत पकडले

श्रीनगर। काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं आहे. ‘ऑपरेशन हलनकुंड’ अंतर्गत लष्कर आणि राज्याच्या पोलिसांनी कुलगामसह अन्य भागातून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडले आहे. त्यातील एक दहशतवादी जखमी आहे. लष्कर आणि राज्याच्या पोलिसांनी १४ नोव्हेंबरपासून दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. ‘ऑपरेशन हलनकुंड’अंतर्गत कारवाईदरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडले आहे. त्यातील एक दहशतवादी जखमी …

Read More »

भारतीय तरूणाने निर्माण केला नवा देश ; स्वतःला घोषित केले राजा

मुंबई। आयुष्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे, स्वतःचे स्थान निर्माण केले पाहिजे असे मोठी लोक सांगत असतात. भारतातील इंदूर येथील एका तरुणाने चक्क स्वतःच्या मालकीचा एक देश निर्माण केला असून स्वतःला त्या देशाचा राजा घोषित केले आहे. या तरुणाचे नाव आहे सुयश दीक्षित. या तरुणाने इजिप्त आणि सुदान या दोन …

Read More »

PoK कुणाच्या बापाचा भाग नाही: फारूख अब्दुल्ला

श्रीनगर। जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या मागच्या वादग्रस्त वक्तव्यापासून घुमजाव करत पाकव्याप्त काश्मीर प्रकरणी नवे विधान केले आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर हा यांच्या (पाकिस्तान) बापाचा भाग नाही’, अशा शब्दांत अब्दुल्ला यांनी आपले मत मांडले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी केलेल्या वक्तव्यात त्यांनी …

Read More »

घरगुती गॅस सिलिंडरचे दर 94 रुपयांनी वाढले; व्यावसायिक सिलिंडरमध्ये 220 रुपयांची वाढ

मुंबई: केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना 739  रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये तब्बल 220  रुपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे. …

Read More »

हवेतील प्रदूषणाने श्वास कोंडलेल्या दिल्लीकरांची व्यथा; राहुल यांचा मोदींवर नेम

नवी दिल्ली: हवेतील प्रदूषणाने श्वास कोंडलेल्या दिल्लीकरांची व्यथा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विटच्या माध्यमातून मांडली. दिल्लीतील भयानक परिस्थिती आणि त्याचा येथील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गझलेतील शब्दरचनेतून चिंता व्यक्त केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींच्या ट्विटची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात …

Read More »

कोणताही ‘पंजा’ गरिबांचा हक्क हिरावू शकत नाही; पंतप्रधान मोदी यांची कॉंग्रेसवर टीका

ऊना। (PNE)- ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे, दिल्लीतून एक रूपया मंजूर झाला तर गावांमध्ये जाईपर्यंत लोकांच्या हातात केवळ १५ पैसेच पोहचतात. मला सांगा, लोकांचे पैसेमध्येच जिरवणारा हा ‘पंजा’ कुणाचा होता? देशात इतकी वर्ष कुणाचं सरकार होतं? या भ्रष्टाचाराला कोण जबाबदार आहे?’ असे सवाल करतानाच ‘आम्ही गरिबांना त्यांच्या हक्काचा पूर्ण रूपया देण्याचा …

Read More »

पोकळ भाषणं पुरे, आता खुर्च्या खाली करा; पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी यांचा घणाघात

नवी दिल्ली।(PNE)- गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना काँग्रेसने अधिक आक्रमक होत सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर सोशल मीडियावरून भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. ‘पोकळ भाषणं पुरे झाली. देशातील महागाई आणि बेरोजगारी नियंत्रित करा अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा शब्दात …

Read More »

तामिळनाडूत पूर, शाळा-महाविद्यालये, 600 कोटी रुपयांचे प्रकल्प ठप्प

चेन्नई।(PNE) –तामिळनाडूत चेन्नईसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांत सलग पाचव्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चेन्नईत चोवीस तासांत २०२ मिमी पावसाची नोंद झाली. १ डिसेंबर २०१५ नंतरच्या पुरानंतरचा हा एका दिवसातील पावसाचा नवा विक्रम आहे. कांचीपुरममध्ये सर्वाधिक ६२७ मिमी पाऊस झाला. राज्यात शुक्रवारी १९३ मिमी पाऊस झाला. किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती …

Read More »

गंगास्नानावेळी झाली चेंगराचेंगरी; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री नितीशकुमार?

बिहार। (PNE)- कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय येथील सिमरिया घाटावर आज सकाळी गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गंगा नदीच्या घाटावर आज पूजेसाठी आणि स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला. त्यानंतर चेंगराचेंगरी …

Read More »

भाजपकडे माझी बनावट सेक्स सीडी; हार्दिक पटेलचा घणाघाती आरोप

अहमदाबाद। (PNE)- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. माझी बदनामी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी माझी बनावट सेक्स सीडी तयार केली आहे, असा दावा त्याने केला आहे. राज्यात निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी …

Read More »