ताज़ा खबरे
Home / अन्तर्राष्ट्रीय / भारतीय तरूणाने निर्माण केला नवा देश ; स्वतःला घोषित केले राजा

भारतीय तरूणाने निर्माण केला नवा देश ; स्वतःला घोषित केले राजा

मुंबई। आयुष्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे, स्वतःचे स्थान निर्माण केले पाहिजे असे मोठी लोक सांगत असतात. भारतातील इंदूर येथील एका तरुणाने चक्क स्वतःच्या मालकीचा एक देश निर्माण केला असून स्वतःला त्या देशाचा राजा घोषित केले आहे. या तरुणाचे नाव आहे सुयश दीक्षित.
या तरुणाने इजिप्त आणि सुदान या दोन देशांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. आणि त्या देशाला नाव दिले आहे ‘किंगडम ऑफ दीक्षित’. इतक्यावरचं हा तरुण थांबला नाही तर त्याने आपल्या देशाचा झेंडाही तयार केला आणि देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्करप्रमुखपदी वडिलांची नियुक्ती केली. हा देश आपणच तयार केला असल्याचा दावा करत या तरुणाने फेसबुकवर स्वताचे आणि देशाचे फोटो पोस्ट केले करीत इतर देशाच्या नागरिकांना या देशाचे नागरिकत्व घेण्याचे आवाहन केले आहे.
इजिप्त आणि सुदान या दोन देशांमध्ये बिर ताविल नावाचा एक ८००चौ. मैलाचा वाळवंटी मोकळा प्रदेश आहे. हा भाग नो मॅन्स लँड म्हणून ओळखला जातो. म्हणजे यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. या तरुणाने याचाच फायदा उठवत या मोकळ्या प्रदेशावर आपली मालकी सांगितली. त्याने स्व:तला तिथला राजा घोषीत करत संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणीही त्याने केली आहे.
फेसबुकवर त्याने आपला अनुभव देखील शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने सांगितले आहे की, ३१९ किमी चा प्रवास करून तो या ठिकाणी पोहोचला आहे. या वाळवंटी प्रदेशात पोहोचण्यासाठी रस्ता बनविलेला नाही असे सुयश म्हणतो. या ठिकाणी आल्यानंतर त्याने या जागेत बी पेरून त्याला पाणी घातले. आता बी पेरून त्याने ही जागा आपलीच असल्याचा दावा केला आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *