ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / PoK कुणाच्या बापाचा भाग नाही: फारूख अब्दुल्ला

PoK कुणाच्या बापाचा भाग नाही: फारूख अब्दुल्ला

श्रीनगर। जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या मागच्या वादग्रस्त वक्तव्यापासून घुमजाव करत पाकव्याप्त काश्मीर प्रकरणी नवे विधान केले आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर हा यांच्या (पाकिस्तान) बापाचा भाग नाही’, अशा शब्दांत अब्दुल्ला यांनी आपले मत मांडले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी केलेल्या वक्तव्यात त्यांनी पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे म्हटले होते.
‘अखेर निर्दोष लोकांचे रक्त कधीपर्यंत वाहात राहणार आहे’, असा सवाल करत अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीर हा आमचा भाग आहे, हा यांच्या बापाचा भाग नव्हे असा शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. ते नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘ ७० वर्षांचा काळ लोटला आहे. तो पाकिस्तान आहे आणि हा हिंदुस्तान आहे. ७० वर्षांपासून ते हा भाग मिळवू शकलेले नाहीत. आणि आजही ते म्हणतात की पाकव्याप्त काश्मीर हा आमचा भाग आहे.’

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *