ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे (page 343)

ताज़ा खबरे

आशिष शेलार यांना धक्काबुक्की? विधानसभेत जा; मोर्चेकऱ्यांनी सुनावलं!

मुंबई :  मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्की झाल्याचं वृत्त आहे. मोर्चेकऱ्यांनी शेलार यांना आझाद मैदानात येण्यापासून अटकाव केला. विधानसभेत जाऊन तुमचं काम करा, असं त्यांना सुनावण्यात आलं. आरक्षण व कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा …

Read More »

बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या बहीणीवर बलात्कार करण्याचा आदेश

राजाराम (पाकिस्तान) – पाकिस्तानातल्या ग्रामीण भागात जिरगा म्हणजेच ग्राम पंचांच्या मंडळाच्या अजब निर्णयाचा मोठाच धसका तेथील रहिवाशांनी घेतला आहे. हे पंच मंडळ बऱ्याचवेळा अमानवी निर्णय देत असल्याच्या अनेक घटना वारंवार घडत असून राजाराम गावातही या जिरगा मंडळाने असाच एक अघोरी निर्णय दिला आहे. एका इसमावर 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा …

Read More »

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी

पुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीने हा निर्णय जाहीर केला असून सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबत येत्या आठ दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांची गेल्या १३ वर्षांची दोस्ती …

Read More »

विरोधकांची एकजूट ही वांझोटी कल्पना : उमर अब्दुल्ला

श्रीनगर : भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या प्रयत्नांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांची एकजूट म्हणजे केवळ दंतकथा असून ती एक वांझोटी कल्पना आहे, अशी टीका करतानाच २०१९ मध्ये विरोधक स्वत:साठीच एकत्र येतील आणि भाजपला पुन्हा ५ वर्ष सत्तेची संधी …

Read More »

शाळांमध्ये योगा सक्तीची गरज नाही: SC

नवी दिल्ली : शाळांमध्ये योगा शिक्षण सक्तीचं करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘शाळांमध्ये काय शिकवावे आणि काय नाही हे सांगण्याचं काम आमचं नाही. आम्ही त्यावर कसे काय आदेश देऊ शकतो?’ असा सवाल करतानाच ‘अशा मुद्द्यांवर केंद्र सरकारनेच निर्णय घ्यावा’, असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं. दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय …

Read More »

मेट्रोच्या कामामुळे दापोडी येथे एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली

पिंपरी : सध्या पिंपरी-चिंचवड येथे मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. या कामामुळे आज (मंगळवारी) दापोडी येथे बीआरटीएस मार्गावर एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटून गॅस गळती झाली. घटनास्थळी एमएनजीएलचे कर्मचारी व पिंपरी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल झाली आहे. गॅसचा वास येताच नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. तथापि एमएनजीएलच्या कर्मच्या-यांच्या म्हणनण्यानुसार गॅस …

Read More »

जलयुक्त शिवार योजनेने देशाला आदर्श दिला- मुख्यमंत्री फडणवीस

पुणे: ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनता उत्साहाने काम करीत आहे. या उत्साहाला संस्थात्मक रूप देऊन राज्य दुष्काळमुक्त करू. नद्या पुनरूज्जिवीत कराव्यात आणि गावे स्वावलंबी करण्याचे उद्दीष्ट ठेवावे. ‘जलसाक्षरता केंद्र‘ ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला ‘ आयडियल मॉडेल’ दिले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्याचा जलसंपदा विभाग आणि ‘यशदा’च्या …

Read More »

वर्दळीच्या रस्त्यांवर पालिकेचे वॉकिंग प्लाझाचे नियोजन

पुणे: पुणे शहरातील महत्त्वाच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने मोठी वर्दळ असलेल्या  रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’ संकल्पना राबवण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. पादचाऱ्यांना पदपथाचा (फूटपाथ) चांगल्या प्रकारे वापर करता यावा, यासाठी लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’चे नियोजन पालिकेने सुरू केले आहे. लक्ष्मी रस्ता हा शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही या रस्त्याला …

Read More »

ऑनलाईन वीजबिल भरणा-या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ

पिंपरी: दरमहा सरासरी 100-110 कोटी रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा करणा-या महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांच्या संख्येत गेल्या तीन महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. गेल्या जुलै महिन्यात 6 लाख 63 हजार ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटच्या माध्यमातून 143 कोटी रुपयांचा घसबसल्या ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह …

Read More »

मावळचे माजी आमदार रघुनाथदादा सातकर यांचे निधन

मावळ दिंडी समाजाचे संस्थापक व मावळचे माजी आमदार रघुनाथदादा शंकरराव सातकर (वय 93) यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रघुनाथ दादा सातकर हे मावळ तालुक्यातून काँग्रेसच्या तिकिटावर 1967 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 1967 …

Read More »