ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / आशिष शेलार यांना धक्काबुक्की? विधानसभेत जा; मोर्चेकऱ्यांनी सुनावलं!

आशिष शेलार यांना धक्काबुक्की? विधानसभेत जा; मोर्चेकऱ्यांनी सुनावलं!

मुंबई :  मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्की झाल्याचं वृत्त आहे. मोर्चेकऱ्यांनी शेलार यांना आझाद मैदानात येण्यापासून अटकाव केला. विधानसभेत जाऊन तुमचं काम करा, असं त्यांना सुनावण्यात आलं.
आरक्षण व कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा मोर्चे निघत आहेत. आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चांपासून राजकीय नेत्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना मोर्चाच्या व्यासपीठावर येऊ देण्यात आलेलं नाही. जिल्हावार मोर्चात सहभागी झालेल्या स्थानिक नेत्यांना इतर मोर्चेकरांसोबतच चालावं लागलं आहे. मुंबईतील आजचा मोर्चाही त्याला अपवाद नाही. त्यामुळंच शेलार यांना आज आझाद मैदानात येण्यापासून रोखलं गेलं असावं, असा अंदाज आहे.
काही मोर्चेकऱ्यांची शेलार यांच्याशी बाचाबाची झाली. ‘विधानसभेत जाऊन तुम्ही मराठा आरक्षणाची भूमिका मांडा. तिथं तुमचं काम करा. इथं येऊ नका. इथं यायचंच असेल तर काहीतरी ठोस आश्वासन घेऊन या, असं मोर्चेकऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आलं. त्यांना धक्काबुक्की झाल्याचंही बोललं जात आहे. मात्र, शेलार यांनी ही चर्चा चुकीची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *