ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / जलयुक्त शिवार योजनेने देशाला आदर्श दिला- मुख्यमंत्री फडणवीस

जलयुक्त शिवार योजनेने देशाला आदर्श दिला- मुख्यमंत्री फडणवीस

पुणे: ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनता उत्साहाने काम करीत आहे. या उत्साहाला संस्थात्मक रूप देऊन राज्य दुष्काळमुक्त करू. नद्या पुनरूज्जिवीत कराव्यात आणि गावे स्वावलंबी करण्याचे उद्दीष्ट ठेवावे. ‘जलसाक्षरता केंद्र‘ ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला ‘ आयडियल मॉडेल’ दिले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचा जलसंपदा विभाग आणि ‘यशदा’च्या संयुक्तपणे आयोजित जलसाक्षरता कार्यशाळा, ‘जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘जलबिरादरी’ चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, चंद्रकांत दळवी, पोपटराव पवार उपस्थित होते.

‘जलसाक्षरता केंद्राच्या उद्घाटना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच खो-यातील नद्यांचे आणलेले पाणी एका जलकुंभात एकत्र करण्यात आले. हा जलकुंभ मुख्यमंत्री यांनी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्याकडे सुपूर्त केला. मंगळवार पासून सुरु झालेल्या नमामि चंद्रभागा जल साक्षरता यात्रे मध्ये ते हा जलकुंभ घेऊन फिरणार आहेत.

‘यशदा’ मधील जलसाक्षरता केंद्राची आणखी उपकेंद्रे नागपूर, अमरावती, औरंगाबाद येथे उभारण्यात येणार आहेत. यासाठी 28 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ‘यशदा’ चे महासंचालक आनंद लिमये, डॉ. सुमंत पांडे यांच्याकडे या जलसाक्षरता केंद्राची जबाबदारी आहे. 7575 जलसेवक (ग्रामपंचायत स्तर), 3510 जलदूत (तालुका स्तर), 340 जलप्रेमी (जिल्हा स्तर), 48 जलयोद्धा (विभाग स्तर), 24 जलनायक (शासकीय अधिकारी-कर्मचारी) प्रशिक्षित करण्याचे उद्दीेष्ट या जलसाक्षरता केंद्रासमोर आहे.

या प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. ‘जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून राज्यात प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभी राहण्यास मदत होणार आहे. या जलकार्यकर्त्यांकडून 25 हजार गावे दुष्काळमुक्त करणार आहोत. पाण्याचा वापर योग्य होतो का, पीके योग्य प्रकारची लावली जातात का, याची काळजी देखील हे प्रशिक्षत कायकर्ते घेतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. राजेंद्रसिंह यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आपल्या संकल्पनेला महाराष्ट्र सरकारने मूर्त स्वरूप जलदगतीने दिले. राज, समाज, महाजन (कॉर्पोरेट) यांनी एकत्र येउन राज्य पाणीदार करण्याचा संकल्प करावा. असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ.आनंद लिमये यांनी प्रास्ताविक केले. सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांनी आभार मानले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *