ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / वर्दळीच्या रस्त्यांवर पालिकेचे वॉकिंग प्लाझाचे नियोजन

वर्दळीच्या रस्त्यांवर पालिकेचे वॉकिंग प्लाझाचे नियोजन

पुणे: पुणे शहरातील महत्त्वाच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने मोठी वर्दळ असलेल्या  रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’ संकल्पना राबवण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. पादचाऱ्यांना पदपथाचा (फूटपाथ) चांगल्या प्रकारे वापर करता यावा, यासाठी लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’चे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.

लक्ष्मी रस्ता हा शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही या रस्त्याला महत्त्व आहे. या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकी, तसेच वाहनांची वर्दळ, पदपथांवर झालेले अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना विनाअडथळा प्रवास करणे अशक्य होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर वॉकिंग प्लाझा ही संकल्पना राबविण्याचा विचार पुढे आला आहे.

सुरुवातीच्या काळात लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम) ते उंबऱ्या गणपती चौक (शगुन चौक) या चारशे मीटर अंतरात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी सल्लागार म्हणून अहमदाबाद येथील एचपीसी डिझाइनची नियुक्ती करण्यात आली आहे. वॉकिंग प्लाझा करायचा झाल्यास लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौक ते शगुन चौकादरम्यान वाहनांवर बंदी घालावी लागणार आहे. तसेच, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरून येणारी वाहने केळकर रस्त्यावरून वर्तुळाकार मार्गाने पुन्हा लक्ष्मी रस्त्यावर आणावी लागतील, असे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *