ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / मावळचे माजी आमदार रघुनाथदादा सातकर यांचे निधन

मावळचे माजी आमदार रघुनाथदादा सातकर यांचे निधन

मावळ दिंडी समाजाचे संस्थापक व मावळचे माजी आमदार रघुनाथदादा शंकरराव सातकर (वय 93) यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

रघुनाथ दादा सातकर हे मावळ तालुक्यातून काँग्रेसच्या तिकिटावर 1967 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 1967 ते 1972 ही पाच वर्षे मावळ तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. कान्हे गावचे सरपंच तसेच मावळ पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी 15 वर्षे जबाबदारी सांभाळली होती. अत्यंत स्पष्टवक्ते नेते म्हणून त्यांची ख्याती होती.

वारकरी संप्रदायात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मावळ दिंडी समाजाची 1972 मध्ये स्थापना झाल्यापासून त्याचे प्रमुख म्हणून ते काम पहात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मावळ दिंडी समाजाच्या आळंदी व पंढरपूर येथील धर्मशाळांची उभारणी करण्यात आली होती.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *