ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी

पुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीने हा निर्णय जाहीर केला असून सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबत येत्या आठ दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांची गेल्या १३ वर्षांची दोस्ती संपुष्टात आल्याने ‘सख्खे मित्र, पक्के वैरी’ झाले आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णयांची घोषणा केली.
‘सदाभाऊ खोत यांनी आजवर केलेले काम आणि त्यांच्यावर गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांमुळे संघटनेची बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांना संघटनेतून काढून टाकण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला आहे. समितीने घेतलेल्या या निर्णयाची माहिती संघटनेचे प्रमुख खासदार शेट्टी यांना देण्यात आली आहे’, असे चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत म्हणाले.
‘खोत यांना चौकशी समितीकडून प्रश्नावली देण्यात आली होती. त्या प्रश्नावलीला उत्तरे देताना त्यांनी काही महत्त्वाच्या धोरणात्मक आणि नैतिक प्रश्नांना तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेऊन बगल दिली आहे. त्यांनी उत्तरांतून केलेला शब्दच्छल समितीला अनावश्यक वाटला. त्यानंतर त्यांना संघटनेतून काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे’, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *