ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / विरोधकांची एकजूट ही वांझोटी कल्पना : उमर अब्दुल्ला

विरोधकांची एकजूट ही वांझोटी कल्पना : उमर अब्दुल्ला

श्रीनगर : भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या प्रयत्नांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांची एकजूट म्हणजे केवळ दंतकथा असून ती एक वांझोटी कल्पना आहे, अशी टीका करतानाच २०१९ मध्ये विरोधक स्वत:साठीच एकत्र येतील आणि भाजपला पुन्हा ५ वर्ष सत्तेची संधी मिळेल, असा टोला उमर अब्दुल्ला यांनी विरोधकांना हाणला आहे.
गुजरातमध्ये राज्यसभेसाठी मतदान सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर बोलताना उमर अब्दुल्ला यांनी ही प्रतिक्रिया दिली. याआधी राज्यसभा निवडणूक एवढी चुरशीची आणि लक्ष केंद्रीत करणारी कधीच नव्हती. मात्र या निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जे मत मांडलं. त्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष द्यायला हवं. सर्वात जुना पक्ष जागा होईल आणि जयराम जे सांगताहेत त्यावर विचार करेल अशी आशा आहे. जयराम रमेश यांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे दुरदृष्टीचा अभावच म्हणावा लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, उमर अब्दुल्ला यांनी तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडविल्याने ते २०१९ मध्ये भाजपसोबत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज राजकीय निरिक्षक वर्तवित आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *