ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे (page 333)

ताज़ा खबरे

पुण्याच्या श्रेया तुपे बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र 2017’

पुणे। (PNE)- गृहिणी असलेल्या पुण्याच्या श्रेया तुपे यांनी उल्लेखनीय सादरीकरण करत ‘मिसेस महाराष्ट्र 2017’वर आपले नाव कोरले. गृहिणी असूनही सासूबाईंसह कुटुंबातील सर्वांकडूनच प्रोत्साहन मिळाल्याने हा सन्मान मिळवू शकले, अशी भावना श्रेया तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी श्रेया यांचे पती आणि कृष्णाई वॉटर पार्कचे संचालक अभिषेक तुपे, सासूबाई रत्नमाला तुपे, …

Read More »

महंमदवाडी चौकात गादी कारखान्याला भीषण आग

पुणे। (PNE)- हडपसर येथील महंमदवाडी चौकातील एका गादी कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.  घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन फायरगाड्या आणि खाजगी टँकर दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत संपूर्ण गादी कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. परंतू नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळाली …

Read More »

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासात दोन अपघात ; 8 जण जखमी

पिंपरी। (PNE)- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान दोन अपघात झाले. यामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबई लेनवर पुण्याकडून मुंबईकडे जाणारा भरधाव महिंद्रा पिकअप टेम्पो टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तीन  महिला, …

Read More »

सिनेमाच्या रांगेत उभे राहता तर राष्ट्रगीतासाठी का नाही? अभिनेते अनुपम खेर यांचा सवाल

पुणे। (PNE)- चित्रपटाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहता, हॉटेलच्या रांगेत उभे राहता तर मग देशाच्या राष्ट्रगीतासाठी का उभे राहू शकत नाही, असा सवाल एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी विचारला. मुक्तछंद आयोजित प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रगीतावेळी आपण उभे राहत असलेल्या 52 सेकंदांत …

Read More »

काशीद येथील समुद्रात बुडून पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

पुणे। (PNE)- काशीद येथे समुद्रपर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुस-याचा शोध सुरू आहे. ही घटना रविवार (29 ऑक्टोबर) रोजी घडली. मयतांमध्ये अक्षय भोसले (रा. औरंगाबाद) आणि अमोल नाझरे (रा. पुणे) यांचा समावेश आहे. यातील अक्षय भोसले याचा मृतदेह सापडला आहे. पुण्यातील …

Read More »

‘आधार’सक्तीला आव्हान; ममतांना SC ने फटकारले

नवी दिल्ली। मोबाइल क्रमांकाशी आधार कार्ड जोडणी अनिवार्य करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. संसदेत मंजूर झालेल्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना सुनावले. आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका पश्चिम बंगाल सरकारने …

Read More »

राज ठाकरेंचा ‘डीएनए’ उत्तर भारतीय; डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची डोंबिवलीत टीका

ठाणे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर प्रदेशातील आहेत, कारण त्यांचा आणि उत्तर भारतीयांचा डीएनए सारखाच आहे,’ असे वक्तव्य भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी डोंबिवली येथे केले. स्वामी यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल हे विधान केल्याचे कळल्यावर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी तिथे धाव घेत, या वक्तव्याचा जाब विचारला. कार्यक्रमस्थळी …

Read More »

ऊसाच्या एफआरपीमध्ये 200 रूपयांनी वाढ होण्याची शक्यता

मुंबई। (PNE)- राज्याच्या ऊस पट्ट्यात यंदाचा गाळप हंगाम सुरु होणार असतानाच आता एफआरपीमध्ये 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय. ९.५ टक्के साखर उताऱ्याला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्यानं …

Read More »

जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

गेवराई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या सह 28 जणांच्या विरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत. बीड जिल्हा बँकेची फसवणूक करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काल मध्यरात्री ही कारवाई झालीय. आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी 14 कोटी रूपये कर्ज घेतलं होतं. …

Read More »

ग्रामीण भागात वर्षभर सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर वैद्यकीय शिक्षण विभागाची कारवाई

मुंबई। (PNE)- वैद्यकीय नियमाप्रमाणे ग्रामीण भागात सेवा न देणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी रद्द कारण्याची कारवाई राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरु केली आहे. राज्यात असे 4500 डॉक्टर आहेत, ज्यांनी नियमाप्रमाणे ग्रामीण भागात 1 वर्ष आपली सेवा दिली नाही. त्याबदल्यात निश्चित केलेली रक्कमही भरली नाही. सरकारी कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष …

Read More »